…तर भारतीय संघ पहिला सामना जिंकू शकतो : सुनील गावसकर

इंग्लंड : वृत्तसंस्था – विश्वचषक म्हणजे क्रिकेटचा महासंग्रामच याला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. भारत हा या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. तसंच भारताच्या विजयाबाबत अनेकांनी वेगवेगळ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यात भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाबाबत काही म्हटलं होतं. संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो, असं गावसकर यांनी म्हटलं होते. तसंच इंग्लंडमधील वातावरण भारतीय खेळाडूंसाठी चांगले असेल, असंही त्यांनी सांगितलं होते.

भारताचा जय-पराजय खेळपट्टीवर अवलंबून असेल. खेळपट्टीवर हिरवळ नसेल आणि संघाने पहिल्यांदा फिल्डिंग केली तर भारत सामना जिंकू शकतो, भाकित आता गावसकर यांनी केले आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपची तयारी करत असून सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. सरावादरम्यान कमतरता शोधून त्यावर काम केलं जात आहे. सध्या केएल राहुल आणि धोनी दोघेही फॉर्ममध्ये आहेत. तर हार्दिक पांड्यासुद्धा तयार आहे, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्याच्या अंगठ्याला लागले आहे. त्यामुळे भारतीय संघाला याचा धक्का बसू शकतो, असं म्हटलं जात होते. मात्र बीसीसीआयच्या सुत्रांनी यावर माहिती दिली आहे. विराटची दुखापत गंभीर नसून तो पहिल्या सामान्यात खेळणार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

दरम्यान, भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत ५ जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होणार आहे. त्यामळे क्रिकेटप्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.