देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, या महिन्यातील खरेदीवर 45 हजारांची होईल बचत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात स्वस्त असणारी MPV (मल्टी परपज व्हीकल) अर्थात रेनो ट्रायबर (Renault Triber) ही सात सीटर कार खरेदी करण्यासाठी नवीन ऑफर आणली आहे. ही एक देशातील सर्वात स्वस्त असणारी ७ सीटर कार आहे. तर ह्या कारच्या खरेदी मागे अधिक बचत होणार आहे. या कारवर मोठी सवलत मिळणार आहे. यामध्ये रोख सवलतींपासून (Cash discount) एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट पर्यंत समावेश आहे.

काय आहे ऑफर?
एप्रिल महिन्यात जर ग्राहकाने Renault Tribe खरेदी केली तर त्यांना एकूण ४५ हजार रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. तर या महिन्यात कंपनी आपल्या ७ सीटरवर १५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि वीस हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देणार आहे. तसेच याव्यतिरिक्त ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस किंवा खास बोनस सुद्धा देणार आहे.

कामगिरी (Performance) –
या कररमध्ये ९९९ Cc, ३ Cylinder, पेट्रोल इंजिन दिले आहे. जे ६२५० Rpm वर ७२ P.S.ची पॉवर आणि ३५०० Rpm वर ९६ NM चे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स दिले गेले आहे.

परिमाण आणि इंधन टाकी (Dimensions and fuel tank) –
या कारमध्ये व्हीलबेस २६३६ मिलीमीटर आहे. याचे ग्राउंड क्लियरेंस १८३ मिलीमीटर आहे. याची लांबी ३९९० मिलीमीटर, रुंदी १७३९ आणि उंची १६४३ मिलीमीटर आहे.

किंमत –
प्रथम किंमत एक्स शोरूम किंमत ५.३० लाख रुपये आहे. तर याच्या टॉप एन्ड व्हेरियंटची किंमत ७.८२ लाख रुपये आहे.

२०२१ रेनो ट्रायबर –
या कारमध्ये Dual Horn Standard दिला आहे. याच्या RXE आणि RXL ट्रिम मध्ये ड्यूअल हॉर्न शिवाय कोणतेही नवे फीचर्स दिले नाही. तर RXT वेरिएंटच्या ORVMs मध्ये नवीन LED टर्न इंडीकेटर्स, नवीन Steering-mounted audio आणि फोन कंट्रोल्स दिले आहेत. याच्या टॉप फीचर्स मध्ये RXZ ट्रिम मद्ये नवीन उंचीची Adjustable driver seat, Optional dual-tone exterior सोबत मिस्ट्री ब्लॅक रूफ आणि ORVMs दिले आहे. Renault ने आपली २०२१ Triber लाइअप मध्ये सीडर ब्राउन पेंट स्कीमचा समावेश केला आहे. ड्यूअल टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन केवळ २०२१ Renault Triber च्या टॉप Model of specification मध्ये मिळणार आहे. २०२१ Triber RXZ व्हेरियंटसाठी ग्राहकांना १७ हजार रुपये अधिक मिळणार आहे.