चिनी सैन्य भारतीय हद्दीत शिरलंय का? उत्तर द्या’, राहुल गांधींचा सरकारला सवाल

पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोना आणि च्रकीवादळाचे संकट असताना भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही लडाख भागात संघर्ष वाढला असल्याचे सांगितले आहे. चीन लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसह पँगाँग त्सो आणि गॅल्व्हन व्हॅलीजवळ वेगानेा सैन्याचा विस्तार करत आहेत. त्यामुळे चिनी सैन्य भारताबरोबर असलेला सीमावाद आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, भारतानेही गॅल्व्हन व्हॅलीत सैन्य वाढवले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ट्वीट करत, चिनी सैन्य भारतात खरेच घुसले नाही आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतरही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मंगळवारी दोन्ही देशांमधील विभागीय कमांडर पातळीवर बैठक झाली. या विषयावरील विभागीय कमांडर स्तराची ही तिसरी बैठक होती. यापूर्वी ब्रिगेडिअर आणि कर्नल रँक अधिकार्‍यांनी चर्चा केली होती. मात्र सीमेवरचा तणाव वाढतच आहे. 2017 मध्ये डोकलाम तिराहा प्रदेशात भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान 73 दिवस चकमक सुरू होती. एवढेच नाही तर दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारत-चीन यांच्यात 3 हजार 488 किमी लांब वास्तविक नियंत्रण रेषेसह आहे. मात्र या सीमेवरून गेली कित्येक वर्ष भारत आणि चीनमध्ये वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिणेकडील तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे, तर भारताने हा आपला अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.