भारत-चीन तणाव : शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जवान म्हणाला – ‘मी जिवंत आहे, शोकाकूल वातावरण बदललं आनंदात’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या सारण जिल्ह्यातील दिघरा ​​गावात एका फोनमुळे मंगळवारची रात्र जितकी जड गेली, बुधवारी दुसऱ्या फोन नंतर तितकाच आनंद झाला. सैन्यदलाचे जवान सुनील कुमार यांच्या घरी पहिल्यांदा शहिद झाल्याची माहिती पोहोचली, पण सोळा तासानंतर सुरक्षित असल्याची माहिती देत घरातील सदस्यांसोबत बोलणेही करून देण्यात आले.

माहितीनुसार, जवान सुनील कुमारच्या घरी आदल्या दिवशी त्यांच्या शहीद झाल्याची दुखद बातमी आली. यानंतर घरात शोककळा सुरू झाली. रात्रीपासून सकाळी 8.30 पर्यंत युनिटकडून वेळोवेळी माहिती मिळत राहिली. सीमेवर चीनशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुनीलचा मृतदेह पाठवण्याची व्यवस्था सकाळपर्यंत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी दीड वाजता शेकडो हितचिंतक त्यांच्या घरी जमले. आमदार चंद्रिका राय, शेजारचे आणि जवानांचे काही जवळचे नातेवाईकही दारात बसले होते.

दरम्यान, लडाखमध्ये तैनात असलेल्या सुनीलचा भाऊ अनिल कुमार रडत म्हणाला की, माझा भाऊ भाग्यवान आहे, तो सुरक्षित आहे. भावाने सांगितले की, सुनीलच्या युनिटकडून कॉन्फरन्सिंग कॉल आला की सुनील जिवंत आहे.

काळजी करू नका, ठीक आहे
सुनीलची पत्नी मेनकाने सांगितले की- माझे जेव्हा कॉन्फरन्स कॉलवर बोलणे झाले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला फार आनंद झाला. फोनवर रोशनीचे वडील बोलत होते. सुनील म्हणाला, तुम्ही लोक काळजी करू नका मी ठीक आहे. पतीच्या हुतात्म्याची बातमी ऐकल्यानंतर गेल्या 16 तासांपासून पत्नी मेनकाची प्रकृती खूपच वाईट होती. पण आता तिचा नवरा जिवंत असल्याची बातमी ऐकून आता जणू आनंद परत आल्यासारखे वाटत होते. सुनील 2021 मध्ये निवृत्त होणार आहे.

गैरसमज: एकसारखे नाव असल्याने शहीद झाल्याची सूचना
दरम्यान, एका गैरसमजामूळे, मंगळवारी चीनच्या सीमेवर झालेल्या चकमकीत सारण येथील सुनील कुमार शहीद झाल्याची माहिती दिली गेली. हे सत्य नंतर समजल्यावर सैन्याने हा गैरसमज दूर केला.

रडवून घालवली संपूर्ण रात्र

रात्रभर घरात दुख:द वातावरण अतुलनीय राहिले. कोणीही खाल्ले नाही. सुनीलच्या नंबरवर कॉल केला जात होता पण तो लागत नव्हता. रात्रभर कोणीही झोपू शकत नव्हते. पण सकाळी सैन्याच्या फोनमूळे आनंद परतला.