भारत आणि चीन यांच्यात होणार ‘सीमा’वाद प्रश्नी बैठक, ‘या’ दोन महत्त्वाच्या व्यक्ती होणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्यात देखील मोठ्या प्रमाणावर सीमावाद असून लवकरच यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी यासंदर्भात चर्चा करणार असून भारताच्या वतीने NSA अजित डोवाल तर चीनच्या वतीने परराष्ट्र मंत्री वँग यी हे बैठकीला उपस्थित राहणार असून या दोघांमध्ये हि चर्चा होणार आहे.

या बैठकीनंतर ऑक्टोबर महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक होणार आहे. त्याआधी या दोन महत्वाच्या व्यक्तींमध्ये होणाऱ्या चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकतेच भारताने जम्मू आणि काश्मीर या राज्यांचे विभाजन कारण्याचा आणि त्यांना केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर होणारी हि बैठक महत्वाची मानली जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या अधिकाऱ्यांनी या विषयात कधीही गांभीर्य दाखवले नसल्याचे म्हटले आहे. भारताने नेहमीच या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.

दरम्यान, भारताने जम्मू काश्मीर संदर्भात घेतलेल्या निर्णयावर देखील चीनने आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचे देखील चीनने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चीन या बैठकीत काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –