सीमेवर तणाव वाढल्यानं सेन्सेक्स 700 अंकांपेक्षा जास्त घसरला, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटींचं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमधील पॅंगॉन्ग सो खोऱ्यात दक्षिणेकडील बाजूला भारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमकींचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे. पुन्हा एकदा भारत आणि चीनमधील वाढत्या सीमा वादामुळे शेअर बाजारात मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स ७२५ अंकांपेक्षा जास्त खाली आला आहे, तर निफ्टी जवळपास २०० अंकांनी खाली आला. सीमेवर तणाव वाढत असल्यामुळे बाजारात नफा बुकिंगचे वर्चस्व राहिले आहे. हॅवीवेट शेअर्स आयसीआयसीआय बँक, एसबीआय, मारुती, एचडीएफसी, एचयूएल ५ टक्क्यांपर्यंत खाली आले. बाजारात घट वाढल्याने गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले.

गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटीपेक्षा जास्त नुकसान
सोमवारी बाजार खाली आल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचा मार्केट कॅप १,५८,३२,२२०.१५ कोटी रुपये होता, जो आज ४,०८,५९१.४१ कोटी रुपयांनी घसरून १,५४,२३,६२८.७४ कोटी रुपये झाला.

तेजीसह उघडला होता बाजार
यापूर्वी जीडीपीच्या आकडेवारीपूर्वी शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्समध्ये ५०० हून अधिक अंकांची उसळी नोंदवली गेली. त्याचबरोबर निफ्टीही १३० हून अधिक अंकांनी वाढला. जागतिक संकेतांकानुसार, शुक्रवारी एस अँड पी ५०० मध्ये सलग सहाव्या दिवशी तेजी आहे. तर डाउ जोन्समध्येही १६० अंकांची उसळी दिसून आली होती. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय आहे.

जीडीपीच्या आकड्यांवर असेल लक्ष
आज सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी चालू आर्थिक वर्षात देशाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी डेटा जाहीर केला जाईल. कोविड-१९ च्या या काळात या आकडेवारीवरून देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र चांगले स्पष्ट होईल. जीडीपी डेटावर बाजार आणि गुंतवणूकदारांचेही लक्ष असेल. आरबीआयच्या सर्व रेटिंग एजन्सींनी आधीच जीडीपीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता नोंदवली आहे.