लडाखमध्ये तापमानात घट , चिनी सैनिकांना होऊ लागला त्रास, काही हॉस्पिटलमध्ये

बीजिंग : वृत्तसंस्था – लडाखमधील थंडीच्या दिवसांत भारतीय जवानांचे हाल होतील असे चीनकडून सांगण्यात येत आहे. लडाखमध्ये हिवाळा असल्यामुळे चिनी सैनिकांचे हाल होत आहेत. उंचावरील काही भागातून चिनी सैनिकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. लडाखच्या उंचावरील भागात थंडीच्या दिवसात तापमान शून्य ते उणे २४ पर्यंत खाली येते. तसेच तिकडे श्वास घेतानासुद्धा त्रास होतो. थंडीची अजून सुरवात झाली नाही तर चिनी सैनिकांना हवामानाचा त्रास होऊ लागला आहे. भारत-चीन दरम्यान तणाव कायम आहे. काही दिवसांपूर्वी चीनने या भागात घुसखोरी करून ताबा रेषा बदलावण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला होता. तर भारतीय जवानाने तो प्रयत्न असफल केला. त्यानंतर भारतीय जवानांनी तिकडच्या उंच भागांवर कब्जा केला. चीननेही उंचावरील काही भागांवर आपले सैन्य तैनात करून भारतीय लष्करावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पॅन्गाँग परिसरातील तापमान ४ अंश सेल्सियस इतके खाली येऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात सरोवर पूर्णपणे गोठते. लडाखजवळील देपसांग आणि दौलत बेग ओल्डी या भागातील तापमान कमी होऊन १४ अंश सेल्सियस इतके खाली आले आहे. तसेच ते अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. चिनी कॉम्बॅक्ट आरोग्यकर्मचारी उंचावरील ठिकाणांहून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांना हटवत आहे.त्यांना स्ट्रेटरवरून घेऊन जाण्यात येत आहे. त्या सैन्यांच्या जागी नवीन सैन्य तैन्यात करण्यात येत आहे.

चीनकडून रुग्णालयाची संख्या वाढवण्यात येत आहे
चीन सैनिकांना फिंगर चारमधील फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चीनकडून रुग्णालयाची संख्या वाढवण्यात येत आहे. भारतीय सैन्याजवळ पॅन्गाँगपेक्षाही अधिक उंचावर तैनात राहण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच भारतीय आणि चीनच्या सैन्याचे हवामानावर लक्ष आहे.

भारतीय लष्कराकडे अधिक अनुभव
भारतीय लष्कराकडून ६७०० मीटर उंच असलेल्या सियाचीन ग्लोशियरमध्ये १९८४ साली लष्करी कारवाई करण्यात आली होती. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी आहे. भारताकडून लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेत वैद्यकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. चीन अधिकाऱ्यांनी, तसेच माध्यमांनी भारतीय सैन्य थंडीच्या दिवसात पॅन्गाँग आणि लडाखमधील उंच भागात जास्त दिवस राहू शकत नाहीत असे म्हटले होते. मात्र तिकडची परिस्तिथी वेगळीच आहे. हिवाळा सुरु होण्याला अजून वेळ असताना तिकडच्या चिनी सैनिकांना हवामानाचा त्रास होऊ लागला आहे.