India-China Face off : लडाख बॉर्डरवरील तणाव संपवण्यासाठी चीननं दिली ’ऑफर’, परंतु भारताला आमान्य

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (एलएसी) वर भारतीय लष्कर तोपर्यंत राहील, जोपर्यंत चीनचे सैन्य आपल्या जागेवरून माघारी जात नाही. भारताने चीनला अनेक प्रसंगी सांगितले आहे की, दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होण्यासाठी पूर्व लडाखच्या वादाच्या ठिकाणांवर 20 एप्रिलच्या अगोदरच्या स्थितीवर यावे लागेल. म्हणजे जो जेथे होता, त्याने त्या ठिकाणी जावे. परंतु, चीनने असे केलेले नाही. इंग्रजी वृत्तपत्र हिंदूस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, या संपूर्ण प्रकरणाशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, भारत सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

रिपोर्टनुसार एका सूत्राने म्हटले की, चीनचे लष्कर पीपल लिब्रेशन आर्मीने या संपूर्ण घटनेला स्टारिंग मॅच बनवले आहे. त्याला वाटते की भारताने हात बांधून बघत बसावे. आम्ही सुद्धा या प्रतिक्षेत बसलो आहोत की, पावले उचलली जावीत, जेणेकरून सीमा वादाच्या होणार्‍या परिणामाची चीनला जाणीव व्हावी.

भारताकडून चीनला मिळाला स्पष्ट संदेश
दोन्ही बाजूच्या लष्करी कंमाडरच्या बैठकीत पीएलए भारतीय लष्कराला न्यू नॉर्मल साठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार लष्कराच्या एका कमांडरने म्हटले की, आक्रमक होणे आणि सीमा तणाव वाढल्यानंतरही पीएलएला भारतीय लष्कराकडून सैन्य इनाम हवे.

भारताकडून चीनला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, जर पीएलए सीमेवरून दूर हटून 20 एप्रिलपूर्वीच्या स्थिती न आल्यास भारत आणि चीनच्या संबंधात तणाव आणखी वाढेल. तर दुसरीकडे चीनला वाटते की, भारत अंतर्गत दबावात येऊन स्वताच वाद संपुष्टात आणेल. लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, पीएलएला वाटते की, भारताने आपल्या पारंपरिक ठिकाणांवरून मागे हटावे.

उदाहरणासाठी पीएलएला गोगाराजवळ कुगरांग नदीच्या बाजूला पहिल्या रिज-लाईनवर थांबायचे आहे, जेणेकरून रिजलाईनवर भारतीय वर्चस्व तुलनात्मक कमजोर होईल. चीनी प्रस्तावावर लष्कराच्या अधिकार्‍याने म्हटले, असे वाटते की, त्यांना नवी दिल्लीच्या मजबूतीचा अंदाज लागत नसावा.