चीनविरूद्ध देशात संतापाची लाट, अ‍ॅक्शनमध्ये मोदी सरकार, जाणून घ्या किती होणार ड्रॅगनचं नुकसान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनच्या फसवणुकीमुळे संपूर्ण देश संतप्त आहे. देशातील प्रत्येक शहरात निदर्शने होत आहेत आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी तीव्र झाली आहे. दरम्यान, सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यासह अनेक प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. भारताने चीनविरूद्ध आर्थिक युद्ध छेडले आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयामुळे ड्रॅगनला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. भारत चीनमधून ज्या वस्तू आयात करतो, त्यापैकी इलेक्ट्रिक वस्तू सर्वाधिक असतात.

भारत चीनकडून सुमारे 34 टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करतो. इलेक्ट्रिक वस्तूंव्यतिरिक्त, न्यूक्लिअर रिऍक्टर आणि यंत्रसामग्री चीनकडून आणल्या जातात. त्याची संख्या सुमारे 18 टक्के आहे. तसेच चीनकडून 10% सेंद्रीय रसायनांची मागणी करतो. या व्यतिरिक्त चीनकडून आपण जवळपास 6 टक्के माणिक आणि दागिने, 4 टक्के लोखंड आणि स्टील मागवतो. तसेच 4 टक्के प्लास्टिक वस्तूं मागवतो, तर उर्वरित 24 टक्के वस्तू आहेत, ज्या आपण चीनकडून खरेदी करतो. 2017-18 या आर्थिक वर्षात भारताने 507 अब्ज डॉलर्सची आयात केली. यात चीनचा वाटा 14 टक्के म्हणजे 73 अब्ज होता.

चिनी वस्तूंची विक्री घटली
भारत सध्या लष्करी व आर्थिक या दोन्ही बाजूने चीनचा सामना करत आहे. चीनशी केलेले करार रद्द केले जात आहेत. त्याचबरोबर, चीनमधून येणार्‍या अनावश्यक वस्तूंवर ड्युटी वाढणार आहे. देशातील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळे, चिनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. देशातील चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये चिनी मोबाईलची विक्री 70 टक्क्यांनी खाली आली आहे. चीनसोबत भारताच्या व्यवसायात 50 अब्ज डॉलर्सचा असमतोल आहे, जो वाढत आहे. आता सरकारने चीनकडून आवश्यक नसलेल्या आयातीला आळा घालण्यासाठी तयारी केली आहे. याबाबत ई-कॉमर्स साइटवर सरकारने नियम अधिक कडक केले आहेत. आता कोणत्या देशात माल बनविला जातो, हे सांगणे बंधनकारक केले आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळ्या शहरांतून चीनविरुद्ध आवाज उठवला जात आहेत, चिनी राष्ट्राध्यक्षांचे पुतळे दहन केले जात आहेत, तसेच चिनी वस्तूंची होळी केली जात आहे.

चीनविरूद्ध देशव्यापी निषेध
कोलकातामध्ये झोमॅटोमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांच्या गटाने राजीनामा दिला, त्यांनी एकत्रितपणे रस्त्यावर झोमॅटो टीशर्ट जाळला आणि चीनविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. हे कर्मचारी झोमॅटोला विरोध करीत होते, कारण झोमॅटो फूड डिलिव्हरी फर्ममध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक आहे, त्यामुळे लोक संतापले आहेत. त्याच वेळी कानपूरमधील व्यापा्यांनी ‘चिनी वस्तू खरेदी करणार नाही, चिनी वस्तू विकणार नाही,’ अशी घोषणाबाजी करत चीनच्या विरोधात चिनी राष्ट्रपतींची अंत्ययात्रा काढली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्येही निर्णय घेण्यात आला आहे की, यंदाच्या दिवाळीत चीनी वस्तूंची खरेदी करणार नाही. मातीचे दिवे पेटवले जातील, आणि स्वदेशी दिवाळी साजरी केली जाईल.

चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता इतर गोष्टींवरही दिसून येत आहे. दिल्लीतील बड्या हॉटेल्सच्या संघटनेने दिल्ली हॉटेल आणि गेस्ट हाऊस ऑनर्स असोसिएशनने निर्णय घेतला आहे की सुमारे 3000 हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये कोणत्याही चीनी नागरिकांची नेमणूक होणार नाही. चीनमधील व्यावसायिकांविरोधात प्रचंड संताप दिसून येत आहे.