भारत-चीन लष्करी अधिकाऱ्यांची 12 तास चर्चा, 4 मुद्यांवर दोन्ही देश आमने-सामने

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताण कमी करण्यासाठी मंगळवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेले ही चर्चा रात्री उशिरा संपली. काल दोन्ही देशांमध्ये 12 तासांपेक्षा जास्त काळ चालणार्‍या कोअर कमांडर पातळीवर चर्चा झाली. यामध्ये पूर्व लडाखमधील गतिरोधकाच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.

भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्स यांच्यात 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या मॅरेथॉन चर्चेच्या परिणामाबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आले नसले तरी एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयीचे या चर्चेमध्ये कोणतेही ठोस परिणाम दिसले नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेचे मुख्य केंद्रस्थान पांगोंग त्सोचे फिंगर -4 क्षेत्र होते. या चर्चेतून तीन गोष्टी उद्भवल्या. प्रथम, सैन्याने माघार घेण्याची प्रक्रिया कशी सुरू होऊ शकते यावर एकमत होऊ शकले नाही. दुसरे म्हणजे, दोन्ही बाजूंनी आपले सैन्य मागे घेण्याविषयी बरीच चर्चा, परंतु परस्पर संमती होऊ शकली नाही.

तिसरा- दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी पेट्रोल पॉईंट -14 सह काही भागातून माघार घेतली होती परंतु ते केवळ प्रतीकात्मक ठरले. अशा परिस्थितीत, जवळपास 12 तास चाललेल्या चर्चेचा कोणताही ठोस परिणाम न मिळाल्यास, अशी आशा आहे की येणारा हिवाळा हा तणाव कमी करेल कारण या भागात हिवाळ्यात सैनिकांसाठी पेट्रोलिंग कठीण होईल.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैनिक हटवणे तर लांबच या उलट चिनी एलएसीवर गेल्या बहात्तर तासांत सैन्यांची जमवाजमव वाढली आहे. चीनने तेथे अधिक सैनिक तैनात केले आहेत. सैनिक मागे घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. विशेषत: पॅंगोंग त्सो आणि हॉट स्प्रिग्स भागात.

या क्षेत्रात भारतही ठामपणे उभा आहे. ज्या प्रकारे दोन्ही बाजूंच्या सैनिकांची जमवाजमव वाढली आहे त्यावरून परस्पर विश्वासाचा अभाव दिसून येतो. चीनवर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान यावेळी चार पॉईंट्सवर तणाव आहे.

– पॅंगोंग त्सो मधील फिंगर -4 रिजलाइन
– गलवान व्हॅली पेट्रोल पॉईंट -14
– हॉट स्प्रिंग्ज येथे पेट्रोल पॉइंट्स 15 आणि 17-ए

फिंगर फोर रिजलाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत. जिथे सेना यापूर्वी दोन्ही बाजूंनी पेट्रोल करत असे तेथे पहिल्यांदा चिनी सैन्य कायमस्वरुपी बसले आहे. झटापटीच्या जागेवर आणि चर्चेच्या मोर्चावर ज्या प्रकारे चिनी सैन्य ठाम आहे त्यावरुन असे दिसते आहे की पीएलए नेतृत्व फिंगर फोर पकडल्याबद्दल ते आपला हट्ट सोडण्यास तयार नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचा हेतू तर भारतीय सीमेमध्ये पश्चिमेकडे जाण्याचा आहे, परंतु भारतीय सैन्याच्या उपस्थितीने त्याचे पाय अ‍डकले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गलवान व्हॅली आणि हॉट स्प्रिंग्ज क्षेत्राची परिस्थिती तितकी वाईट नाही पण पॅंगोंग त्सोमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. येथे सैन्य दोन्ही बाजूंनी पूर्णपणे समोरासमोर आहे.