संपुर्ण देशानं एकत्र येवून चीनला उत्तर द्यायला हवं, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला चीनला प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले आहे. लडाख सीमा वादात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. ही वेळ अशी आहे जिथे संपूर्ण देशाने एकत्रित येऊन याचे उत्तर दिले पाहिजे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, ‘१५-१६ जून रोजी गलवान खोऱ्यात भारताच्या २० शूर सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले. देशाच्या या सैनिकांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण केले. या सर्वोच्च बलिदानाबद्दल आपण या धैर्यवान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत, पण त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ नये.’

ते म्हणाले की, ‘आज आपण इतिहासाच्या नाजूक मार्गावर उभे आहोत. आपल्या सरकारचे निर्णय आणि सरकारची पावले ठरवतील कि आपल्या भावी पिढ्यांनी आपले मूल्यांकन कसे करावे. जे देशाचे नेतृत्व करतात, त्यांच्या खांद्यावर कर्तव्य बजावण्याची जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी त्यांच्या शब्द आणि घोषणांद्वारे देशाच्या सुरक्षेवर आणि ऐहिक व भूभागीय हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. चीनने एप्रिलपासून बर्‍याच वेळा गलवान खोरे आणि पॅंगॉन्ग त्सो लेकमध्ये घुसखोरी केली आहे.’

घुसखोरीबाबत ते म्हणाले की, आपण त्यांच्या धमकी व दबावापुढे झुकणार नाही आणि आपल्या भूभागीय अखंडतेशी कोणताही करार स्वीकारणार नाही. पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यासह त्यांच्या षडयंत्र रचनेला बळ देऊ नये आणि हे सुनिश्चित करावे की, सरकारने सर्वांगाने या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी परस्पर सहमतीने काम करावे.’

ते असेही म्हणाले की, ‘ही अशी वेळ आहे जिथे संपूर्ण देशाने एकत्रित येऊन आणि संघटित होऊन याचे उत्तर द्यायचे आहे. आम्ही सरकारला इशारा देऊ की, दिशाभूल करणारा प्रचार हा मुत्सद्दीपणा आणि मजबूत नेतृत्वाचा पर्याय कधीच असू शकत नाही. मागच्या सहयोगींकडून खोट्या प्रचारामुळे सत्य दाबले जाऊ शकत नाही.’