राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानं चीन ‘सैरभैर’, ग्लोबल टाइम्सनं लिहीलं – ‘हिवाळ्यात वाढेल तणाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी चीनच्या प्रश्नावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत एक निवेदन दिले. त्याचवेळी चीनला इशारा देण्यात आला की भारतीय सैन्य प्रत्येक अडचणीसाठी तयार आहे. आता त्यावर चिनी माध्यमांची प्रतिक्रिया आली आहे. ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे की, भारताचे संरक्षणमंत्री यांचे विधान चिथावणी देणारे आहे आणि यामुळे सीमेवरील तणाव हिवाळ्यात वाढू शकतो.

चीनच्या सरकारी वृत्तपत्राने तज्ञांच्या हवाल्यात म्हटले आहे की, लडाख सीमेवरील प्रश्न लवकर सोडवणे कठीण आहे. म्हटले आहे की असे विधान करून भारताचे संरक्षणमंत्री आपल्या लोकांना आपले सैन्य आणि सरकार सज्ज असल्याचे आश्वासन देऊ इच्छित आहेत. पण सत्य असे आहे की ही परिस्थिती भारतामुळे निर्माण झाली आहे.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की, हिवाळ्यात परिस्थिती कठीण होणार हे भारताला समजले आहे आणि तो चीनविरूद्ध युद्ध करू शकत नाही. यासाठी चीनने भारतातील घसरणारा जीडीपी आणि बेरोजगारीच्या समस्येचा हवाला दिला आहे.

चीनी मीडियाच्या मते ज्याप्रमाणे भारतीय सैन्य पाकिस्तान सीमेवर छोट्या लढायांमध्ये व्यस्त आहे, तशीच परिस्थिती चीन सीमेवरही निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत चिनी सैन्य सज्ज असले पाहिजे. त्याचवेळी असा आरोप केला गेला होता की भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी सीमेवरील परिस्थितीचे सर्व आरोप चीनवर लावले आणि हा करार मोडण्याविषयी बोलले.

ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की भारताला असे वाटते की आपले सैनिक दीर्घकाळ चीनच्या सीमेवर राहिले तर हे युद्ध शांततेच्या दिशेने जाऊ शकते. म्हणूनच भारत असे बोलत आहे. ग्लोबल टाईम्सकडून सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न वारंवार सुरु आहेत आणि ते वातावरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे सीमेवर भारताने हिवाळ्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय सैन्य लगातार त्यांना लागणाऱ्या वस्तू गोळा करत आहेत, सैनिकांसाठी हिवाळ्यातील कपडे-तंबूंची व्यवस्था केली जात आहे. मे महिन्यापासूनच चीन सीमेवर टिकून आहे, अशा परिस्थितीत या प्रश्नावर तोडगा निघताना दिसून येत नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही असे संकेत दिले होते.