India-China Standoff : गलवान संघर्षात किती सैनिक मारले गेले ? चीननं पहिल्यांदाच सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासोबतच्या सीमावादादरम्यान चीनने या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेल्या हिंसक संघर्षात आपले किती सैनिक मारले गेले याची संख्या प्रथमच सांगितली आहे. चीनने भारतासोबत चर्चेदरम्यान मान्य केले की, त्यांचे गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात 5 सैनिक मारले गेले आहेत.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, मोल्डोमध्ये भारत आणि चीनदरम्यान चर्चेत चीनने यास दुजोरा दिला. दरम्यान, या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

तत्पूर्वी सरकारी सूत्रांनी सांगितले होते की, बिजिंगने मान्य केले आहे की, त्यांचा एक कमांडिंग ऑफिसर हिमालयात 15000 फुट ऊंच गलवान नदीच्याजवळ मारला गेला होता. संघर्षादरम्यान कारवाईत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. साऊथ ब्लॉकच्या एका प्रमुख सरकारी सूत्रांनी सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात जखमी चीनी सैनिकांची संख्या खुप जास्त असणार आहे. जेव्हा चीन पाच सांगतो, तोव्हा त्यास तीनने गुणावे.

अगोदरपासून प्रयत्न करत आहे चीन ?
भारत आणि चीनदरम्यान मेच्या सुरूवातीपासून पूर्व लडाखमध्ये वाद सुरू आहे. सरकारी अधिकार्‍याने सांगितले की, यावर्षी मे मध्ये अधिकृत वाद सुरू झाला असला तरी चीन 2017 डोकलाम संकटानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर प्रकरणांना पुढे वाढवण्याचा प्रयत्न करत होता.

अधिकार्‍याने सांगितले की, पीएलएने 15-20 जवानांऐवजी 50 ते 100 सैनिकांची पेट्रोलिंग पार्टी पाठवण्यास सुरूवात केली होती. नाव न छापण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले की, 2017 च्यानंतर चीनीने एका पेट्रोलिंग पार्टीत 20 पेक्षा जास्त पुरुष असून नयेत, हा सहमत प्रोटोकॉल धुडकावण्यास सुरूवात केली होती. निश्चित प्रकारे या मोठ्या चीनी पेट्रोलिंग पार्ट्यांनी आपल्या गस्ती दलांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. भारताने हे प्रकरण चीनच्या समक्ष अनेकदा मांडले होते, परंतु त्याकडे त्याने लक्ष दिले नाही. भारतीय सैन्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, चीन पूर्व लडाखमध्ये किमान मागच्या एक वर्षात जमीनीवर कब्जा मिळवण्याची योजना बनवत होता. कोविड-19 ने त्याच्यासाठी योग्य संधी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like