India China Face Off : चीनची रणनीती ! नेपाळनंतर आता बांगलादेशही भारताच्या विरोधात ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला घेराव घालण्याची तयारी केली आहे. एकीकडे चीनच्या सांगण्यावरून नेपाळने देशाच्या नकाशावर तीन भारतीय प्रदेश ठेवून भारताकडे डोळेझाक केली आहे, तर दुसरीकडे एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रास्त्र बंदीचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. नेपाळ आणि पाकिस्तानसह चीन आता बांगलादेशला जवळ आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शेजारच्या देशांशी भारताच्या आर्थिक मुत्सद्दीपणाच्या पार्श्वभूमीवर चीनने बांगलादेशी उत्पादनांवरील 97 टक्के उत्पादन शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान चीनच्या या घोषणेमुळे बांगलादेशातील राजकीय नेत्यांनी सांगितले की बिजिंग आणि ढाका यांच्या संबंधांमधील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चीनने मत्स्य आणि चामड्याच्या उत्पादनांसह 97 टक्के वस्तूंवर कर माफ केला आहे.

एक महिन्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कोरोना विषाणूबद्दल चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला होता, आम्ही आर्थिक हेतूने चीनला निर्यात केलेल्या वस्तूंना करात सूट मिळावी अशी मागणी केली आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी मोहम्मद तौहिदुल इस्लाम यांनी स्पष्ट केले. त्यानंतर चीनच्या स्टेट कौन्सिल टॅरिफ कमिशनने एक अधिसूचना जारी केली आहे. बांगलादेश हा विकसित देश नसल्याने त्याला करात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या साथीने होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यात त्यांना मदत होईल असे सांगितले.

बांगलादेश चीनकडून सुमारे 15 बिलियन डॉलर आयात करतो, तर बांगलादेशातून चीनला निर्यात केलेल्या वस्तूंचे मूल्य आयातीपेक्षा खूपच कमी आहे. चीनने म्हटले आहे की या सवलतींमुळे व्यापार तूट कमी होईल आणि बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत होईल. सोमवारी रात्री लडाख सीमेवर चीनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले असून 76 सैनिक जखमी झाले आहेत.

दरम्यान दोन्ही देशांनी आता वाढत्या तणावाच्या दरम्यान आपले सैन्य सतर्क ठेवले आहे. लडाख सीमेजवळील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने सैन्याला फ्रि हँड दिल्याची माहिती समोर येत आहे. भारत आणि चीन एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने चीननेही भारताविरूद्ध रणनीती बनवण्यास सुरवात केली आहे. चीनी सरकार दावा करत आहे की गलवान हा चीनचा प्रदेश आहे, परंतु तो भाग लडाखचा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.