चीनने चालबाजी केली तर मिळेल ‘ठासून’ उत्तर, भारताने पँगोंग सरोवराच्या जवळ तैनात केले मार्कोस कमांडो

लडाख : भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असतानाच, भारतीय नौदलाने आपले मरीन कमांडो (MARCOS) पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराच्या प्रदेशात तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत वादाच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीय हवाई दलाचे गरुड आणि लष्कराचे पॅरा स्पेशल फोर्सचे कमांडो तैनात आहेत. आणि आता नौदलाने सुद्धा आपले मरीन कमांडो तैनात केले आहेत.

न्यूज एजन्सी एएनआयने सरकारी सूत्रांच्या संदर्भाने सांगितले की, मरीन कमांडो तैनात करण्याचा हेतू, तीन सेवांचे एकीकरण वाढवणे आणि अत्यंत थंड हवामानाच्या स्थितीत नौदल सैनिक कमांडो आपली ताकद दाखवू शकतात.

भारत आणि चीनचे लष्कर या वर्षाच्या एप्रिल-मेपासून आमने-सामने आहे. याशिवाय नौदलाच्या कमांडोसाठी लवकरच सरोवरात येण्या-जाण्यासाठी नवीन बोटी सुद्धा तैनात करण्यात येणार आहेत. भारतीय लष्कराचा स्पेशल फोर्स ज्यामध्ये पॅरा स्पेशल फोर्सेस आणि कॅबिनेट सेके्रटरिएटचे स्पेशल फ्रंटियर फोर्स सहभागी आहेत. पूर्व लडाखमध्ये मोठ्या कालावधीपासून स्पेशल ऑपरेशन राबवले जात आहे.

चीनसोबतच्या संघर्षाच्या सुरूवातीच्या दिवसात भारतीय हवाई दलाच्या गरुड विशेष दलाने कोणत्याही लढाऊ किंवा अन्य विमानांची देखरेख करण्यासाठी आपआपल्या संरक्षण प्रणालीसह एलएसी पर्वतांवर पाठवले आहे. यापूर्वी भारतीय नौदलाने जम्मू-काश्मीरच्या वुलर सरोवर परिसरात दहशतवादाला तोंड देण्यासाठी आपल्या मार्कोस टीमला तैनात केले आहे.

भारतीय लष्करात लडाखमध्ये मोर्च्यात तैनात आपल्या जवानांसाठी राहण्याची चांगली सुविधा उपलब्ध केली आहे. लष्कराने खास प्रकारचे साहित्य वापरून तयार केलेले स्मार्ट कॅम्प तयार केले आहेत जे चोवीस तास गरम राहतात. हे कॅम्प पूर्णपणे सुरक्षित आणि सुविधांनी सज्ज आहेत. लष्करानुसार, नोव्हेंबरनंतर पूर्व लडाखच्या उंचीवरील भागात बर्फवृष्टी सुरू होते. 40 फुटांपर्यंत बर्फ जमा होतो. थंड हवेचा प्रकोप असतो. तापमान शून्य पासून 30-40 डिग्री खाली जाते. रस्त्यांचा वापर करणे सुद्धा अवघड होते.