India-China Face off : चीनी सैन्यानं ‘गलवान’नंतर आता ‘हॉट स्प्रिंग’ भागातून घेतली पूर्णपणे माघार – सूत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पूर्व लडाखमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला चीन आणि भारत दरम्यानचा सीमा विवाद आता कमी होताना दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चीनने लडाखच्या वादग्रस्त भागातून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेतले आहे. सूत्रांनी सांगितले आहे की, लडाखच्या हॉट स्प्रिंगच्या पेट्रोल पॉईंट 15 पासून दोन किलोमीटर मागे भारतीय-चीन सैन्य सरकले आहे. त्याचबरोबर, सूत्रांनी सांगितले आहे की गोग्राच्या पेट्रोल पॉईंट 17 ए पासून सैन्याला गुरुवार किंवा शुक्रवारी दोन किलोमीटर मागे हटवले जाईल.

सद्यस्थिती काय आहे?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याकडून पॅंगॉन्ग तलावाजवळ फिंगर 4 भागात चिनी सैन्याच्या हालचाली पहिल्या जात आहेत. चिनी सैन्याने या भागातून आपली वाहने आणि तंबू वगैरे हटवले आहेत. तथापि, अजूनही रिज लाइनवर हालचाल सुरू आहे. अधिक माहिती म्हणजे आधी फिंगर 4 च्या पुढेपर्यंत भारतीय सैन्य गस्त घालत असत, पण फिंगर 4 मध्ये चिनी सैनिकांच्या उपस्थितीनंतर त्यांच्या पेट्रोलिंगमध्ये हस्तक्षेप होत आहे.

चीनी सैन्य गलवानपासून दीड किलोमीटर मागे गेले

याआधी सोमवारीच पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिक मागे सरकले होते. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक चकमकीच्या जागेपासून 1.5 कि.मी. दूर गेले आहे. हे कदाचित गलवान खोऱ्यापर्यंतच मर्यादित आहे. आता यास बफर झोन बनविण्यात आले आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडू नयेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जून रोजी कोर्प्स कमांडरच्या बैठकीत यावर एकमत झाले. यानंतर 30 जूनला कोर्प्स कमांडर तृतीय स्तराच्या बैठकीत डिसएंगेजमेंटची पुष्टी करण्यासाठी 72 तासांचा वॉच पीरियड देखील ठरवण्यात आला. ज्यानंतर आता दोन्ही बाजूंकडून सैन्य माघार घेतल्याची बातमी येत आहे.