मोठा खुलासा ! ‘ड्रॅगन’नं ‘या’ भीतीनं लपवला ठार झालेल्या चीनी सैनिकांचा आकडा

पेईचिंग : वृत्त संस्था – पूर्व लडाखजवळील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसाचार झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर भारताने केलेल्या प्रत्युत्तरात चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त काही वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांनी दिलं. पण चीनने अद्यापही त्यांचे किती सैनिक मारले गेले याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे. तणाव वाढवायचा नसल्याचं चीननं म्हटलं आहे. मात्र, आता चीनबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या भीतीमुळे चीनने मृत सैनिकांचे आकडे लपवले असल्याची माहिती मिळतं आहे.

चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक होणार होती, असे वृत्त साऊथ चायना मॉर्निंग ने दिलं आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती चीनने भारतासोबत घडलेली घटना किरकोळ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. या धोरणांतर्गत चीनने मृत सैनिकांचा आकडा जाहीर केला नसून, चीन सैन्याचे प्रवक्ते झांग शुइली यांनी या हिंसक झटापटीत दोन्ही बाजूची जीवितहानी झालं असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण मृतांचा आकडा जाहीर करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, चीन आपल्या सैनिकांच्या मृत्यूबाबत अत्यंत सवेंदनशील आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मंजुरीनंतरच सैनिकांच्या मृत्यूचे आकडे समोर येतील. शी जिनपिंग हेच सैन्याचे अध्यक्ष असून, यामागे सुद्धा त्यांचाच संबंध आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक होणार होती. भारत-चीन सीमा वादावर सुद्धा या बैठकीत चर्चा करण्यात आली. अमेरिकेसोबतच्या या बैठकीत भारतासोबतच्या संघर्षाचा मुद्दा उचलला जाऊ शकतो, ही भीती चीनला होती. चीनला काहीही करुन पॉम्पियो-यांग यांच्या बैठकीअगोदर तणाव कमी करायचा होता. मात्र, एखादा देश या तणावाचा गैरफायदा घेत असेल, तर आमच्या सैनिकांना योग्य ते उत्तर देता येत असं सांगितलं आहे.

संयुक्त राष्ट्रानंतर अमेरिकेने देखील आता शांततापूर्ण वाद मिटवण्याचा आवाहनं केलं आहे. अमेरिकन गृह विभागाने शहीद झालेल्या भारतीय जवानांविषयी संवेदना व्यक्त केली असून, भारत आणि चीन यांच्यातील एलएसीवरच्या घटनाक्रमवार अमेरिकेचं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिलं आहे.