चीनला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका देण्याची तयारी, नितीन गडकरींनी सांगितला ‘हा’ प्लान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन सिमेवर आव्हान देणाऱ्या चीनला दणका देण्यासाठी भारत सरकारकडून सैन्यासह आर्थिक बाबतीतही बरीच तयारी केली जात आहे. चीनवरुन येणाऱ्या विविध वस्तूंना प्रतिबंधित सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे. आणि आता अनेक वस्तुंवर आयात शुल्क वाढवण्याची तयारी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, विशेष करून स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये घरेलू उत्पादन वाढवण्यासाठी भारताला त्या भागातील आयात शुल्क वाढवण्यासाठी विचार करायला पाहिजे. ज्यामध्ये आयात केलेल्या वस्तुंव सर्वाधिक अवलंबून आहे. गडकरी सीआयआयच्या कार्यक्रमात बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, कदाचित तुम्हाला ही गोष्ट आवडणारी नाही, मात्र काही प्रकरणात आपल्याला आयात शुल्क वाढवावे लागेल. जोपर्यंत आपण चीनप्रमाणे उत्पादन वाढवत नाही, तोपर्यंत किंमत वाढणार नाही. यासाठी आपल्याला ड्यूटी वाढवावी लागेल आणि भारतीय मॅन्युफॅक्चरर्सना वाढवावे लागेल. जेव्हा जास्त प्रमाणात उत्पादन होईल, तेव्हा स्वाभविक स्वरुपात आपण त्याला प्रतिस्पर्धी बनू शकतो.

नितीन गडकरी यांनी उद्योगांना आवाहन केले की, महानगर आणि विकसित शहरांपेक्षा ग्रामीण, गावोगावी, आदिवासी भागात उद्योगांचे एक नेटवर्क तयार करण्याकडे लक्ष द्या. उद्योगपतींचे 90 टक्के लक्ष हे शहर आणि महानगरांमधील प्रमुख उद्योगांवर असते. या गोष्टींमुळे खूप वाईट वाटतं. याउलट ग्रामीण, आदिवासी भागात खूप कमी लोक लक्ष देतात. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीनला विविध प्रकारे घेरण्याचा प्रयत्न भारताकडून केला जात आहे. चीनचे ॲप बंद केल्यानंतर सीमेवरही भारतीय सैन्याची जोरदार तयारी सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like