चीनला आणखी एक मोठा झटका ! आता भारतात कलर TV आयात करण्यास बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनला चहूबाजूंनी घेरण्याची योजना भारताकडून आखण्यात आली आहे. केंद्र सरकारने कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली. चीनच्यासारख्या देशातून टीव्ही खरेदी करून उत्पादनाला चालना देणे कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.

कलर टीव्हीसाठी आता डीजीएफटीकडून आयात करण्याचे वेगळे लायसन घ्यावे लागणार आहे. या लायसन्स नंतर चीनकडून आयात झालेले टीव्ही खरेदी करता येणार आहेत. याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया आणि इंडोनेशिया या देशांचाही यामध्ये समावेश आहे. याआधी भारतानं जवळपास 120 हून अधिक चीन अ‍ॅप आणि वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हे निर्बंध 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी घातले आहेत. हा निर्बंध 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टीव्ही सेटवर देखील लागू करण्यात येणार आहे.

मागच्या वर्षात भारतात 428 मलियन डॉलर टीव्हीची आयात करण्यात आली. तर व्हिएतनाममधून 293 मिलियन डॉलर एवढी आयात करण्यात आली होती. सरकारने चीनकडून आयात केल्या जाणार्‍या सोलर सेलवर एका वर्षासाठी सेफगार्ड ड्यूटी लावली आहे. आता सोलर सेलवर हे शुल्क जुलै 2021 पर्यंत लागू असेल. विशेष म्हणजे याचा थेट फायदा देशांतर्गत कंपन्यांना होणार आहे.