चीन सीमेवर काहीतरी मोठं होणार ? खांद्यावरून चालविल्या जाणार्‍या मिसाईलसोबत जवान तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्वी लडाख मध्ये नियंत्रण रेषेजवळ चिनी हेलिकॉप्टर्सच्या वाढत्या हालचालींना उत्तर देत भारतीय सेनेने तिथल्या महत्वाच्या उंचावरील ठिकाणी खांद्यावर ठेऊन हवेत मारा करता येईल असे मिसाइल घेतलेले जवान तैनात केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मूळची रशियन असलेली एगला एयर डिफेन्स सिस्टम चा वापर करत महत्वाच्या उंचावरील ठिकाणी जवान तैनात करण्यात आले आहेत. ते शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.’

रशियन असलेल्या एगला एयर डिफेन्स सिस्टमचा वापर आर्मी आणि वायुसेना दोघेही करतात. याचा वापर तेव्हा केला जातो, जेव्हा शत्रू राष्ट्र लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर करतात किंवा सीमापार करण्याचा प्रयत्न करतात. भारताकडून शत्रू राष्ट्राच्या हवाई हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रडार आणि हवाई मिसाइल तैनात करण्यात आल्या आहेत. सीमेवर अधिक कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वीय लडाख जवळील गलवान घाटीतून घुसखोरीचा प्रयत्न चिनी सैनिकांकडून अनेकदा केला गेला.

भारतीय सेनेने चिनी हवाई सेनेच्या हेलिकॉप्टर्सकडून केले जाणाऱ्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी Su-30MKI भारताने तैनात केलं होतं. भारत सध्या झिंजियांग आणि तिबेटच्या होटन, काशगर, होपिंग, लिंझी, गर गुंसा या भागांवर नजर ठेवून आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने नुकतेच अनेक ठिकाणं अपग्रेड केली. राहण्यासाठी जागा, रनवे ची लांबी वाढवली, अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये एक हेलिकॉप्टर बेस आहे त्या ठिकाणी चीनने अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी एक हेलिपॅड नेटवर्क देखील बसवलं आहे.