चीनला मोठा झटका ! ‘कोरोना’ संकटादरम्यान भारतानं घटवली एवढी ‘आयात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाख सीमा वादावरून भारत-चीनदरम्यान संघर्षाची स्थिती आहे. भारत चीनला प्रत्येक आघाडीवर जोरदार प्रत्युत्तर देत आहे. याच दरम्यान कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय, दळणवळण ठप्प असल्याने चीनकडून 24.51 टक्के आयात घटली आहे. एप्रिल-सप्टेंबर 2020 च्या दरम्यान भारताने चीनकडून 27377.55 मिलियन डॉलरची आयात केली. मागच्या वर्षी याच कालावधीत भारताने चीनकडून 36267.41 मिलियन डॉलर किमतीच्या वस्तू आयात केल्या होत्या. सप्टेंबर 2019 च्या तुलनेत स्पटेंबर 2020 मध्ये कोरोनाचा परिणाम झाल्याने भारताकडून 10.15 टक्के कमी म्हणजे 5787.61 मिलियन डॉलर किमतीच्या वस्तू आयात केल्या. भारताच्या एकुण आयातीत चीनी वस्तूंचा सहभाग 18.41 टक्के असतो.

कोरोनामुळे चीनशिवाय या देशांकडून सुद्धा कमी झाली आयात
कोरोना संकटामुळे मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल-सप्टेंबर 2020 मध्ये अमेरिकेकडून 40.67 टक्के आयात करण्यात आली. तर, संयुक्त अरब अमीरातकडून 41.86 टक्के, हाँगकाँगकडून 23.81 टक्के, सौदी अरबकडून 52.33 टक्के, इराककडून 52.02 टक्के, इंडोनेशियाकडून 26.92 टक्के, कोरियाकडून 41.29 टक्के, सिंगापुरकडून 37.53 टक्के आणि जर्मनीकडून 39.58 टक्केच आयात करण्यात आली. याशिवाय जपानकडून 35.21 टक्के, ऑस्ट्रेलियाकडून 45.67 टक्के, स्विझरलँडकडून 70.92 टक्के, रशियाकडून 28.70 टक्के, दक्षिण अफ्रीकाकडून 43.35 टक्के, ब्रिटनकडून 48.34 टक्के, कुवेतकडून 61.91 टक्के कमी आयात करण्यात आली.

अर्थव्यवस्था रूळावर येण्याचे संकेत
कोविड-19 संकटातून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, सप्टेंबर 2020 मध्ये भारताने 27.40 बिलियन डॉलर मूल्याच्या वस्तूंची निर्यात केली, जी सप्टेंबर 2019 च्या तुलनेत 5.27 टक्के जास्त आहे. सप्टेंबर 2019 मध्ये भारताने 26.02 बिलियन डॉलर मूल्याच्या वस्तू निर्यात करण्यात आल्या होत्या.

या प्रमुख 5 आयात आणि निर्यात होणार्‍या वस्तू
जागतिक व्यापारात भारत आपली भागीदारी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. सप्टेंबर 2019 च्या तुलनेत सप्टेंबर 2020मध्ये धान्याच्या निर्यातीत 304.71 टक्केची वाढ नोंदली गेली आहे. याशिवाय लोह खनिज 109.52 टक्के, तांदूळ 92.44 टक्के, ऑईल मील्स 43.90 टक्के आणि कार्पेट निर्यातीत 42.89 टक्केची वाढ नोंदली गेली. तर, सिल्व्हरच्या आयातीत 93.92 टक्के घसरण नोंदली गेली. याशिवाय कॉटन कच्चे आणि वेस्ट 82.02 टक्के, न्यूज प्रिंट 62.44 टक्के, सोने 52.85 टक्के आणि ट्रान्सपोर्ट उपकरणे 47.08 टक्के कमी आयात करण्यात आली.