डोनाल्ड ट्रम्पची भारताला ‘कोपरखळी’ ; म्हणे भारतात ‘या’ मुलभूत सुविधा नाहीत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हवा आणि पाणी प्रदुषनावर भारत आणि चीनचे कान टोचले आहेत. भारत, चीन आणि रशियामधील हवा आणि पाणी शुद्ध नाही आणि हे देश जगातील पर्यावरणाच्या प्रती आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ब्रिटीश चॅनेल आय़टीव्ही वर एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे.

पॅरिस जलवायू करारातून बाहेर येत ट्रम्प यांनी अमेरिकेचे पाणी आणि हवा सर्वाधिक साफ असल्याचा दावा केला आहे. युएसएमध्ये सर्वाधिक साफ पाणी आणि हवा आहे, हे त्यांनी काही अकाड्यांच्या आधारावर सांगितलं. तसंच अमेरिकेची हवा दिवसेंदिवस अधिक चांगली होत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

चीन, भारत, रशिया आणि इतर काही देशात ना शुद्ध पाणी ना शुद्ध हवा. तसंच या देशांकडे प्रदुषण आणि स्वच्छेच्या बाबतीत समजही नाहीये. जर तुम्ही या देशाच्या कोणत्याही शहरात गेलात तर तेथे श्वास घेणेही अवघड आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं. हे म्हणताना त्यांनी जाणून शहरांची नावं घेतली नाही. तसंच हे देश प्रदुषणाच्या बाबतीत आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, असंही त्यांनी यावेळी नमूद केले.

ट्रम्प यावेळी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रिंस चार्ल्स यांच्याशी भेट घेत पर्यावरणाच्या मुदद्यवर संवाद साधला. पर्यावरणाच्या ऱ्हास आणि पाणी-हवेत होणारे बदल यावर जागरुकता करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली.

पाणी आणि हवेतील होणारे परिवर्तन रोखण्यासठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पॅरिस करारावर सही केली होती. मात्र नंतर ट्रम्प यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पॅरिस करारातून अमेरिकेचा घुमजाव हा विश्व तापमान कमी करण्याच्या आणि पर्यावरण सुरक्षेला झटका होता. कारण पॅरिस करारातून अमेरिकेची माघार म्हणजे विकसनशील देशांना पर्यावरण संरक्षणासाठी फंड मिळणार नाही. कारण या करारामार्फत विकसित देशांकडून दरवर्षी १०० अरब डॉलर देण्याचे ठरवण्यात आले होते. तसंच अमेरिकेने यातील ५० करोड डॉलर फंड दिला होता.

You might also like