India-China Standoff : LAC वादावर पुन्हा होणार कमांडर लेव्हलची बैठक, चीनने पहिल्यांदा उचलले हे पाऊल

नवी दिल्ली/लडाख : भारत आणि चीनच्या दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 5 महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी आज कोअर कमांडर्सची पुन्हा एकदा बैठक होत आहे. दोन्ही देशातील कोअर कमांडर्समधील ही सातवी बैठक आहे. चीनने सीमेवर 60 हजारपेक्षा जास्त सैन्य तैनात केल्याचा खुलासा काल अमेरिकन संरक्षण मंत्र्यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आज होणारी बैठक महत्वाची ठरणार आहे.

या अगोदरच्या बैठकीत दोन्ही देश एलएसीवर आणखी सैनिक तैनात करणार नाहीत यासाठी सहमत झाले होते, परंतु तरीसुद्धा वादाची स्थिती कायम आहे. या सातव्या बैठकीत प्रथमच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. तर, भारताने सुद्धा सीनियर डिप्लोमॅट जॉईंट सेक्रेटरी (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांना लेफ्टनन्ट जनरल हरिंदर सिंह यांच्या सोबत राहाण्यास सांगितले आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये चीन क्षेत्र मोल्डोमध्ये 21 सप्टेंबरला कमांडर स्तरावरील सहावी बैठक झाली होती, ही बैठक 14 तास चालली होती.

आजच्या बैठकीत पूर्व लडाखमध्ये संघर्षाच्या ठिकाणावरून चीनच्या सैनिकांनी पूर्णपणे मागे परतावे, यावर जोर दिला जाईल. सूत्रांनी सांगितले की, पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) वर भारताकडून चुशूलमध्ये ही बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल. तिचा अजेंडा पूर्व लडाखमध्ये संघर्षाच्या सर्व ठिकाणांवरून सैनिकांच्या परतीसाठी रूपरेषा तयार करण्याचा असेल.

लेफ्टनंट जनरल मेनन सुद्धा राहतील उपस्थित
माहितीनुसार, भारताकडून या बैठकीत लेह येथील 14व्या कोअर (फायर अँड फ्यूरी)चे कमांडर, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांची ही शेवटची मीटिंग असेल. 14 ऑक्टोबरपासून त्यांची जागा लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन घेणार आहेत. हरिंदर सिंह यांचा कोअर कमांडर स्तराचा कार्यकाळ संपला आहे. आता त्यांना डेहरादून येथील आयएमए म्हणजे इंडियन मिलिट्री अ‍ॅकेडमीचे कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सोमवारी होणार्‍या बैठकती भारतीय प्रतिनिधी मंडळात लेफ्टनंट जनरल मेनन सुद्धा उपस्थित राहतील.