‘डोकलाम’नंतर भारताने बनवला ‘हा’ ‘मास्टरप्लान’, ज्यामुळे भडकला चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनवर नजर ठेवणार्‍या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लडाखमध्ये वाद हा सामान्य पेट्रोलिंगमधील संघर्षाचा भाग नाही, तर चीनच्या त्या युद्धखोर रणनितीचा भाग आहे, जो त्याने डोकलामनंतर स्वीकारला आहे.

73 दिवसाचा डोकलाम वाद अलिकडील वर्षांमधील सर्वात गंभीर संघर्ष होता. त्यानंतर आता लडाखमध्ये पुन्हा अशी स्थिती झाली आहे. डोकलाम वादानंतर चीनच्या काही हालचाली त्याचा हेतू स्पष्ट करतात. वाद भारत-चीन-भूतानच्या ट्राजंक्शनवर झाला होता. भूतानच्या भागात चीन रस्ता तयार करत असल्याने भारताने ती भूमिका घेतली होती. शेवटी रस्ते बांधणी रोखावी लागली.

मागच्या महिन्यात 5 आणि 6 तारखेला भारतीय आणि चीनी लष्कराचा वादग्रस्त पँगाँग तलावावरून संघर्ष झाला, यामुळे संपूर्ण भागात तणाव निर्माण झाला.

भारतीय लष्कराने मागच्या वर्षी पूर्व लडाख आणि अरूणाचल प्रदेशात एक महिन्याच्या कालावधीत दोन मोठे वॉरगेम (लष्करी सराव) केले होते. हे युद्ध सराव प्रथमच केले गेले ज्यात चीनच्या तुलनेत आपल्या युद्ध क्षमतेचा आढावा घेतला. मात्र, याच्या पुढच्या महिन्यात चीनच्या हालचाली आणखी आक्रमक आणि असामान्य होत्या.

चीनची गावे की लष्करी छावण्यांचा विस्तार ?
चीनी लष्कर एकीकृत मॉडल गावांची निर्मिती करत आहे, जे अन्य काहीही नसून एलएसीच्या जवळ कँटोनमेंटचा विस्तार आहे. फ्रंटीयरवर लष्कर आणि नागरिक सोबत असावेत, हाच त्यांचा प्रयत्न आहे.

सूत्रांनी सांगितले की, मागच्या वर्षी येथे मोठमोठ्या इमारतींचे रहिवाशी परिसर तयार करण्यात आले आहेत, जेथे बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल कोर्टसारखे खेळ आणि मनोरंजनाच्या सुविधा आहेत. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, या परिसरांच्या निर्मिती मागे चीनचा दुहेरी हेतू आहे. मात्र, बहुतांश परिसर रिकामा आहे, येथे कोणीही नागरिक नाहीत.

एका अधिकार्‍याने सांगितले, लष्कर आणि नागरिक दोघे या परिसराचा वापर करू शकतात. हे यासाठी बनवले असावे की, तणावाच्या स्थितीत जमीनीवरील हक्क मजबूत व्हावा.

या जागेवर ऑब्झर्व्हेशन टॉवर्ससुद्धा आहेत आणि सर्व चीनी पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या अधिपत्याखाली आहे. एलएसीजवळ दोन डझनपेक्षा जास्त एकीकृत गावे आहेत. यापैकी बहुतांश अरुणाचल प्रदेश आणि सिक्किमच्या समोर पूर्व सेक्टर मध्ये आहेत. चीनी लष्कराच्या या एकीकृत गावांजवळ हॉटेल्स बनवण्याची सुद्धा योजना आहे.

डोकलामनंतर लष्करी ताकद वाढवली
डोकलामचा वाद मिटला असला तरी चीनकडून लष्करी विस्तार बंद झालेला नाही. चीनने डोकलामनंतर एलएसीमध्ये विविध भागात आपल्या टँक रेजीमेंट्स तैनात केल्या आहेत. काही बाबतीत यांचे एलएसीपासूनचे अंतर अवघे 20 किलोमीटर आहे. ही व्यवस्था यासाठी केली गेली आहे की चीनी लष्कराचा मोबिलायजेशन टाइम कमी करता यावा.

फायरिंग, हँड ग्रेनेड फेकण्याचे ट्रेनिंग
सूत्रांनी सांगतले की, 2017 मध्ये डोकलाम वादानंतर लगेचच चीनी पीपल्स लिब्रेशन आर्मीने एलएसीजवळ आपला ट्रेनिंग कार्यक्रम अधिक वेगाने सुरू केला. नव्या ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये सतत फायरिंग, ग्रेनेड फेकणे आणि कठोर शारीरिक ड्रिल्सचा सहभाग आहे. दोन नवीन ट्रेनिंग मॅन्युअल होते जे 2018 आणि 2019 मध्ये अमलात आणले.

भारताच्या नव्या युद्ध रणनितीने भडकला चीन
भारतीय लष्कराने आपल्या नव्या युद्ध रणनितीतून चीनला उत्तर दिले, तसेच आपली लष्करी रचनाही वाढवली. सध्याचा वाद भारतीय रस्ता निर्मिती आणि पायाभूत विकासावरून आहे. ज्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. भारतीय लष्कराने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये लडाख आणि अरूणाचल प्रदेशात प्रमुख भागात दोन सराव केले.

भारतीय लष्कराने सप्टेंबरमध्ये पूर्व लडाखमध्ये आपल्या विविध विंग्जसोबत एकीकृत लष्करी सराव केला. हा सराव भारत आणि चीनी सैनिकांमधील संघर्षानंतर काही दिवसानंतर झाला. या सरावात टँक, इन्फट्री जवान, हेलीकॉप्टरमधून उडी मारणारे पॅराशूट, मॅकनाइज्ड इन्फंट्रीचा सुद्धा सहभाग होता. ही सर्व तयारी चीनच्या विरोधात लष्कराच्या क्षमतेचा आढावा घेण्यासाठी होती.

याच्या एक महिन्यानंतर एक आणखी वॉरगेम अरुणाचल प्रदेशात झाला. एलएसीच्या प्रमुख क्षेत्रातापासून 100 किमी अंतरावर 14,000 फुट उंचीवर भारताच्या नव्या युद्ध रणनितीची टेस्ट घेण्यात आली.

इंटीग्रेटेड बॅटल ग्रुपची क्षमाता तपासणीसाठी हा वॉरगेम त्वांगजवळ झाला. यावर चीनचा खुप विरोध झाला.

भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर हा पहिलाच उन्हाळ्याचा सिझन आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर लडाख थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणात आले आहे.