धाडस सुद्धा आणि तयारी पण ! ‘गलवान’मध्ये चीन मागे हटण्यासाठी उपयोगी आली PM मोदींची ‘ही’ रणनिती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत-चीनमध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेला तणाव थोडा कमी झाल्याचे संकेत दिसत आहेत. चीनी सैन्य आता गलवान खोर्‍यापासून 1-2 कि.मी. मागे सरकले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रविवारी चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली होती, ज्यानंतर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. भारत आणि चीनमध्ये मोठ्या कालावधीपासून सीमा वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रतिनिधी ठरवण्यात आले आहेत. भारताकडून अजित डोभाल स्थायी प्रतिनिधी आहेत, ज्यांची चर्चा चीनी परराष्ट्र मंत्र्यांशी झाली आहे.

चीनी सैन्य जर मागे सरकले असेत तर या पाठीमागे भारताची राजकीय निती आणि कूटनिती आहे. जी मागील अनेक दिवसांपासून सतत सुरू आहे. घटनक्रमानुसार पाहिल्यास यामध्ये अनेक महत्वाचे फॅक्टर आहेत. उदाहरणार्थ भारताने बॉर्डरवर सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले, चीनविरूद्ध जगभरात वातावरण तयार केले, अमेरिकेसह अनेक देशांच्या प्रतिक्रिया आल्या, स्वत: मोदी लडाखला गेले. प्रथम आर्मी चीफ गेले, दुसरीकडे चर्चा सुरू राहिली. अनेकवेळा डिवचल्यानंतर सुद्धा पंतप्रधानांनी चीनचे नाव घेतले नाही. अनेक अ‍ॅप बॅन केले आणि चीनी कंपन्यांचे टेंडर रद्द करत दर्शवले की आम्ही झुकणार नाही, परिणाम असा झाला की, चीनने प्रकरण वाढवून देखील काही फायदा झाला नाही.

पीएमचा लडाख दौरा

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक सकाळी लडाखला पोहचले आणि सैन्याचे मनोबल वाढवले. लडाखमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला कठोर संदेश दिला. त्यांनी म्हटले होते की, आता विस्तारवादाचे युग नाही, तर विकासवादी नितीचे आहे. मात्र, मोदींनी चीनचे नाव न घेता निशाणा साधला. त्यांनी म्हटले होते की, आम्ही कृष्णाची बासरी आणि सुदर्शन चक्र दोन्हीला आदर्श मानतो. पीएम मोदी यांनी लडाखमध्ये जखमी झालेल्या सैनिकांचीही विचारपूस केली.

जवानांचे मनोधैर्य वाढवताना पीएम म्हणाले होते, तुमचे शौर्य आणि धाडस संपूर्ण जगाने पाहिले आहे. यासोबतच लेहमध्ये पीएम मोदी यांनी एलएसीवरील स्थितीची माहिती घेतली होती. मोदी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्यासोबत 11 हजार फुटाच्या उंचीवरील निमूपर्यंत गेले. पीएम मोदी यांच्या दौर्‍याचा अर्थ राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या त्या ओळीत दिसून येतो, ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ऐकवल्या होत्या.

चीनवर अ‍ॅप्सचा मोठा तडाखा

चीनसोबत बिघडलेल्या संबंधानंतर भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलत 59 चीनी अ‍ॅप्सवर बॅन लावला. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर जाणकारांनी म्हटले की, यामुळे चीनी अ‍ॅप्स संचालन करणार्‍या कंपन्या आणि खुद्द चीनला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

एका अंदाजानुसार एकट्या टिकटॉकच्या बॅनमुळे कंपनीला 100 कोटी रूपयांचा फटका बसला आहे. कारण भारतात केवळ मार्च ते मे 2020 च्या दरम्यान 10 पैकी सर्वात जास्त डाऊनलोड होणारे मोबाईल अ‍ॅप्स चीनी कंपन्यांचेच आहेत. यामध्ये टिकटॉक, झूम, हेलो, युव्हिडिओ आणि यूसी ब्राऊजर हे अ‍ॅप्स आहेत. हे अ‍ॅप्स लाखो करोडो भारतीय वापरत होते. मात्र, अजूनही अनेक चीनी अ‍ॅप भारतात सुरू आहेत.

आर्थिक आघाडीवर झटका

चीनला भारत आर्थिक आघाडीवर सतत झटके देत आहे. आता भारत सर्व हायवे प्रोजेक्ट्समध्ये चीनी कंपन्यांना बॅन करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. चीनी कंपन्यांना संयुक्त उद्योग भागीदार म्हणूनही काम करू दिले जाणार नाही. यापूर्वीच रेल्वेचे अनेक ठेके चीनी कंपन्यांकडून काढून घेण्यात आले आहेत. सध्या देशात काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये चीनी कंपन्या भागीदारीत आहेत. गडकरी यांनी म्हटले की, नवा निर्णय सध्याच्या आणि भविष्यातील सर्व प्रोजेक्टसाठी लागू होईल.

लडाखमध्ये सैन्याची उपस्थिती वाढली

चीनशी वाद झाल्यानंतर भारताने आपले सैन्य दुप्पटीने वाढवले. भारताला हे पाऊल यासाठी उचलावे लागेल कारण चीनचे सैन्य एलएसीला बदलण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षा एजन्सीजच्या नजरेतून ही बाब समोर आली होती. सैन्याने संपूर्ण लडाखच्या परिसरात 40 ते 45 हजार जवान तैनात केले आहेत. अगोदर ही संख्या 20 ते 24 हजार होती. याशिवाय भारतीय जमीनीच्या सुरक्षामध्ये भारत-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) च्या जवानांची संख्याही वाढवण्यात आली आहे. एका अधिकार्‍याने आजतक इंडिया टुडेला सांगितले की, चीनी सैनिकांची संख्या भारतापेक्षा कमी आहे आणि ही संख्या सुमारे 30-35 हजारच्या जवळपास आहे.

बॉर्डरवर फायटर जेट्स

चीनच्या सीमेलगत असलेल्या वायुसेनेच्या फॉरवर्ड एयर बेसवर जबरदस्त हालचाल आहे. वायुसेनेची लढाऊ विमाने सतत गस्त घालत आहेत. विमानांनी सैनिक आणि सामान लडाखच्या विविध भागात पाठवले जात आहे. बालाकोट एयर स्ट्राइकमध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारी मिग 29 विमाने, अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टरसुद्धा येथे तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलाच्या या फॉरवर्ड एयर बेसवरून चीनवर लक्ष ठेवण्यासाठी मल्टी रोल कॉम्बॅट, मिराज-2000, सुखोई-30 आणि जाग्वार सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. ही सर्व लढाऊ विमाने शस्त्रांनी सज्ज आहेत.

अमेरिकेशी दोस्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी यांच्या संदेशाला ट्रम्प यांनी रिप्लाय देत म्हटले की, धन्यवाद माझ्या मित्रा… अमेरिका, भारतावर प्रेम करते. दोन्ही नेत्यांच्या या संवादाने चीनची बेचैनी वाढू शकते. भारतविरूद्ध चीनच्या विस्तारवादी नितीवर अमेरिकन सिनेटर जोरदार टीका करत आहेत.

एका अमेरिकन सीनेटरने म्हटले की, चीन कधीही अंतरराष्ट्रीय करारावर विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे, रिपब्लिकन सीनेटर रिक स्कॉट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून म्हटले की, अमेरिका, चीनच्या विरूद्ध भारताचे समर्थन करते. चीनला वाटते की, तो तेव्हाच पॉवफुल होऊ शकतो जेव्हा अमेरिका आणि भारत कमजोर होतील.

असे अनेक फॅक्टर आहेत, ज्याचा परिणाम सध्याच्या भारत-चीन सीमावादावर दिसून आला आहे. पंतप्रधानी अगोदरच स्पष्ट केले आहे की, गलवान खोरे आमचे आहे. यासाठी चीनला हा स्पष्ट संदेश आहे की, त्याच्याकडे मागे सरकण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. दुसरीकडे सैन्याने आपल्या सर्व दलांद्वारे चीनवर बारीक नजर ठेवून संकेत दिला की, आपल्या मातृभूमीचा एक-एक इंचाचे संरक्षण करतील, यासाठी कितीही बलिदान द्यावे लागले तरी चालेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like