India China Border News : गलवान नदीच्या पाण्याच्या ‘भोवर्‍या’त फसली चीनची सेना ! LAC हून मागे हटण्यासाठी होऊ शकतात ‘मजबूर’

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमधील वाद सुरूच आहे. दावा केला जात आहे की, चीनचे सैने एलएसीच्या काही किलोमीटर आतमध्ये घुसले आहे. तर भारताचे सैन्य तोडीसतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे. यादरम्यान, बातमी आहे की, चीनच्या सैन्याला येथून मागे हटावे लागू शकते. कारण ज्या गलवान नदीच्या किनारी चीनचे सैन्य उभे आहे, तेथे पुरासारखी परिस्थिती तयार होत आहे.

गलवान नदीत पूरसदृश्य स्थिती!
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गलवान नदीच्या किनार्‍यावर चीनच्या सैन्याच्या अडचणी वाढू शकतात. चीनचे सैन्य गलवान नदीच्या किनार्‍यावर उभे आहे, येथे पाण्याची पातळी किनार्‍याच्या खुप वरपर्यंत पोहचला आहे. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, या परिसरात तापमान वाढल्याने आजूबाजूच्या पर्वतांवरील बर्फ वितळत आहे. यामुळे पाण्याची पातळी खुपच वाढत आहे. सॅटेलाइट आणि ड्रोनद्वारे मिळालेल्या छायाचित्रांद्वारे हे संकेत मिळाले की, चीनने जेथे तंबू उभारले होते तेथे पाणी भरले आहे. येथून पुढील काळात तर चीनच्या सैनिकांसाठी आणखी अवघड स्थिती होणार आहे.

जीवघेणे आहे गलवान नदीचे पाणी
गलवान नदी अक्साई चिन क्षेत्रातून सुरू होते. तो परिसर जो अनेक वर्षांपासून बर्फाने अच्छादलेला आहे. मागच्या महिन्यात म्हणजे 15 जूनला याच भागात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये आपले 20 जवान शहीद झाले होते. असे म्हटले जाते की, त्यावेळी सैनिकांचा जीव गलवान नदीत पडल्यामुळे गेला. नदीचे पाणी इतके थंड होते की, जखमी सैनिकांनी ताबडतोब जीव सोडला. भारताने पूर्व लडाखमध्ये गलवान नदीवर पूल बांधला आहे, ज्यामुळे चीन बिथरला आहे.

अजूनही वाद सुरूच
एलएसीवर भारत आणि चीनदरम्यान मागच्या सुमारे 9 आठवड्यांपासून वाद सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही. परराष्ट्र मंत्री आणि सैन्य अधिकार्‍यांमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत. याशिवाय राजकीय स्तरावरसुद्धा मुद्दा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान पीएम मोदी यांनी लडाख दौरा करून सैनिकांचे मनोधैर्य वाढवले आहे. सध्या सीमेवर कोणताही तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत.