भारताशी ‘पंगा’ घेणं ‘ड्रॅगन’ला खूपच महागात पडलं, संपुर्ण जगात घटली चीनी सामानांची ‘डिमांड’

बिजिंग : कोरोना व्हायरसमुळे जगभरात अजूनही व्यापाराने गती घेतलेली नाही. तर, चीनला भारताशी वाद हळूहळू महागात पडत असल्याचे दिसत आहे. जगभरात चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची मागणी लागोपाठ घसरत चालली आहे. यामुळे चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हालचालींचा वेग जूनमध्ये कमी झाला आहे. मात्र, सध्या फॅक्टरीच्या कामांमध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. तर, चीनची राजधानी बिजिंगमध्ये कोविड-19 ची नवी प्रकरणे समोर आल्याने आणि जगभरात संसर्गाची वाढती प्रकरणे, यामुळे हळूहळू डॉमेस्टिक रिकव्हरी मंदावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कोविड-19चे प्रकरणे वाढल्याने घटली जागतिक मागणी
चीनचा खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) जूनमध्ये घसरून 50.4 राहण्याची शक्यता आहे, जो मे मध्ये 50.6 वर होता. याचा अर्थ हा आहे की, फॅक्टरींमध्ये हालचाली कमी होत आहेत. निर्देशांक 50 च्या वर राहिल्यास समजले जाते की, उत्पादनात वाढ होत आहे.

वुहानमध्ये प्रवासावरील बंदी एप्रिलमध्ये हटवण्यात आली होती. यानंतर चीनमध्ये लॉकडाऊनमुळे अनेक आठवडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. आता तेथे स्थिती पहिल्यापेक्षा चांगली आहे. तर, जगभरात कोविड-19 ची प्रकरणे वाढल्याने निर्यात मागणी कमजोर झाली आहे. कोरोना व्हायरसची सेकंड वेव्ह रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला तर जागतिक मंदी अंदाजापेक्षा गंभीर होईल.

चीनची राजधानी बिजिंगमध्ये जूनच्या सुरूवातीला एका फूड मार्केटमध्ये 200पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या. यामुळे लोकांमध्ये पुन्हा कोविड-19 बाबत भिती निर्माण झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्व अर्थव्यवस्थांसाठी व्हायरसमुळे निर्माण झोलला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका आहे.

मॉर्गन स्टेनली यांनी म्हटले की, कोविड-19 च्याविरूद्धची आपली लढाई अजून संपलेली नाही. जगभरात नव्या केस समोर येण्याचे सत्र पहिल्याच्या तुलनेत आणखी वाढले आहे. जागतिक महामारीमुळे चीनसह जगभरात फक्टरींमध्ये क्षमतेपेक्षा कमी कामकाज होत आहे.

चीनच्या निर्यातीमध्ये नोंदली गेली 3.3 टक्के घसरण
यींगडा सीक्युरिटीजचे संशोधक हू यंहाँग यांनी म्हटले की, चीनमध्ये काम पुन्हा सुरू झाले आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये यामध्ये जास्त घसरण झालेले नाही आणि वाढदेखील झालेली नाही. चीनच्या निर्यातीमध्ये मे महिन्यात 3.3 टक्केची घसरण नोंदली गेली, परंतु महामारीशी संबंधीत उपचारांच्या पूर्ततेच्या मागणीमुळे स्थिती थोडी ठिक झाली आहे. मात्र, कॅपिटल इकॉनॉमिक्सने म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होमची व्यवस्था घटने, मास्क आणि दुसर्‍या सुरक्षा उपकरणांचा स्टॉक जमवणे मंदावल्यामुळे कामाकाजात आलेली सुधारणा जास्त काळ टिकण्याची शक्यता कमीच आहे.