भारताच्याविरूध्द चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून ‘या’ प्रकल्पावर सुरू केलं काम

नवी दिल्ली : लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण (एलएसी) रेषेवर भारत आणि चीनी लष्करामध्ये काही भागात अजूनही तणाव आहे, ज्याचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर पडत आहे. अशात भारतावर दबाव आणण्यासाठी चीनने ल्हासापासून नेपाळच्या काठमांडूपर्यंत 2250 कोटी रूपये खर्चाचा रेल्वे मार्ग बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

हा रेल्वे मार्ग पुढे भारत-नेपाळ सीमेच्या जवळ असलेल्या लुम्बिनीला जोडला जाईल. हे चीनचे विकासाचे युद्धधोरण आहे. हा करार अनेक वर्षांपासून थंडावला होता, परंतु जेव्हा चीन आणि भारतामध्ये एलएसीवर तणाव वाढला, तेव्हा पुन्हा चीनने हा प्रोजेक्ट पुन्हा सुरू केला. चीनची टीम आता तिबेट ते कांठमांडूपर्यंत या रेल्वे प्रोजेक्टच्या कामात गुंतली आहे. याची छायाचित्रे सुद्धा चीनी मीडियात ट्रेंड करत आहेत.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे चीनप्रेम जगजाहीर आहे. चीन ओली यांची खुर्ची वाचवत आहे आणि त्या बदल्यात ओली चीनच्या इशार्‍यावर निर्णय घेत आहेत. ओली नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहेत. बॉर्डरवर तणावाच्या वातावरणात चीनने नेपाळपर्यंत रेल्वे लाईन टाकण्यास सुरूवात केली आहे.

चीनने ल्हासाला काठमांडूशी जोडणार्‍या एक दशकांपूर्वीच्या जुन्या रेल्वे योजनेवर काम सुरू केले आहे. ही रेल्वे लाइन तिबेटच्या ल्हासा ते शिगात्सेहून केरूंगला पोहचेल आणि पुन्हा रसवा गाधी वरून नेपाळमध्ये दाखल होईल आणि काठमांडूपर्यंत जाईल. ल्हासा ते शिगात्सेपर्यंत काम पूर्ण झाले आहे, तर शिगात्से ते केरूंगपर्यंतचे काम सुरू झाले आहे. तर नेपाळच्या भागात या योजनेवर चीन सर्वे करत आहे.

चीनी मीडियाने या रेल्वे प्रोजेक्टच्या सर्वेची छायाचित्रे जारी केली आहेत. छायाचित्रात एक टीम कॉरिडोर साईटचा सर्वे करताना दिसत आहे. अशावेळी, जेव्हा नेपाळ आणि भारतामध्ये सीमा तणाव सुरू आहे, चीन आपल्या योजनेद्वारे नेपाळमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

या रेल्वे लाईनसाठी चीन 300 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 2250 कोटी रूपये खर्च करणार आहे. चीनच्या काठमांडूला जोडणार्‍या या रेल्वेमार्गावर अनेक ब्रिज आणि बोगदे बनवण्यात येतील.

अगोदरच तिबेटहून काठमांडूची रेल्वे लाईन भारताच्या दृष्टीने चुकीची होती, परंतु आता चीन आणि नेपाळ या रेल्वे लाईनला आणखी पुढे नेण्याचा विचार करत आहेत. जो प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, त्यानुसार ल्हासा- काठमांडू रेल्वे लाइनला आता भारताच्या सीमेवर असलेल्या भगवान बुद्धांचे जन्मस्थळ लुम्बिनीपर्यंत आणण्याचा विचार केला जात आहे. जर रेल्वे लाईन काठमांडूच्या पुढे वाढवली तर ती भारताच्या सीमेपर्यंत येईल.

याचे दोन धोके आहेत. पहिला युद्धाचा धोका आहे आणि तर दुसरा धोका आर्थिक आहे. चीनचा माल भारताच्या दरवाज्यापर्यंत सहज पोहचवला जाईल आणि यास नवे रूप देऊन भारतात डंपदेखील केला जाऊ शकतो.

या महत्वाकांक्षी योजनेची डेडलाईन 2025 आहे. मात्र, नेपाळमध्ये रेल्वे मार्ग बनवण्यासाठी सर्वे सुरू आहे. परंतु, भारत रणनितीच्या प्रमाणे चीनला उत्तर देण्यासाठी एका योजनेवर काम करत आहे. नेपाळमध्ये चीनचा प्रभाव रोखण्यासाठी भारताने सुद्धा एका रेल्वे कॉरिडोरचा प्रस्ताव ठेवला आहे.

भारत आणि नेपाळमध्ये 6 रेल्वे लाईन बनवण्याची योजना आहे. जयनगर-जनकपुर-बार्दीबास रेल्वे लाईनचा खर्च 5.5 अरब रुपये आहे. 136 किलोमीटरची काठमांडू-रक्सोल रेल्वे लाईन बनवली जाणार आहे. या योजनेला जमीनीवर साकारण्यासाठी भारतीय टीमने अगोदरच अभ्यास केला आहे.

या योजनेवर बोलताना रेल्वे बोर्डाचे चेयरमन व्ही. के. यादव म्हणाले, आम्ही आपल्या सर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला वर ठेवले आहे. मात्र, सध्याच्या प्रोजेक्टची टाइमलाईन आणि डिटेल नंतर देण्यात येईल.