सीमेवरील तणावादरम्यानच चीननं भारताकडून केलं या उत्पादनाचे विक्रमी ‘इम्पोर्ट’, जाणून घ्या काय ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने एका असामान्य स्थितीतून बाहेर येत जून महिन्यात भारताकडून विक्रमी प्रमाणात पीव्हीसीची आयात केली आहे, ती सुद्धा अशा वेळी केली आहे जेव्हा दोन्ही देशांच्या सीमेवर वाद सुरू आहे, आणि व्यापार कमी करण्याची मागणी होत आहे. ग्लोबल रबर मार्केटच्या रिपोर्टनुसार, चीनने जूनमध्ये भारताकडून विक्रमी 27,207 मेट्रिक टन पीव्हीसीची आयात केली, जी मे महिन्याच्या 5,174 मेट्रिक टनाच्या आयातीच्या पेक्षा पाचपट जास्त होती. भारताने कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान पीव्हीसीच्या निर्यातीत वाढ केली होती.

भारतीय पीव्हीसी मार्केट सुमारे 20 लाख मेट्रिक टन प्रति वर्ष घटले
ग्लोबल रबर मार्केटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे एक आगळे-वेगळे पाऊल आहे, कारण भारतीय पीव्हीसी मार्केट सुमारे 20 लाख मेट्रिक टन प्रति वर्ष घटले आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान पीव्हीसीची मागणी घसरली, आणि डिलिव्हरीज रद्द कराव्या लागल्या. यानंतर पुरवठादारांना अतिरिक्त पुरवठा क्लीयर करण्यासाठी आपले कार्गा चीनकडे पाठवावे लागले. बाजार सूत्रांनी म्हटले की, त्यांना वाटते की, भारताकडून चीन आता पीव्हीसीची आयात घटवू शकतो, कारण जूनच्या प्रारंभी लॉकडाऊन समाप्त झाले. जूनच्या डिलिव्हरीसाठी मेमध्येच सौदे झाले होते.

पॉलीविनाईल क्लोराईड (पीव्हीसी) जगात पॉलीएथिलीन आणि पॉलीप्रोपेलीननंतर सर्वाधिक व्यापक प्रमाणात उत्पादित प्लास्टिक आहे, आणि हे उद्योग, बांधकाम, कृषी, कंज्यूमेबल्स, पॅकेजिंग, विद्युत उत्पादने आणि पब्लिक युटिलिटीजमध्ये एक व्यापक व्हरायटी म्हणून वापरले जाते. पीव्हीसी अत्यंत टिकाऊ, रेजिस्टंट आणि फ्लेक्सिबल आहे, ज्याचा उपयोग क्लोथिंग, पाईप, इन्सुलेशन आणि अनेक अन्य क्षेत्रांसाठी केला जातो. आयातीवर प्रतिबंध लावण्यासाठी भारतीय कंपन्या चीनवरील आयात अवलंबत्व कमी करण्यासाठीच्या पद्धतींवर सरकारला प्रस्ताव देत आहेत. भारताकडून चीनला पीव्हीसीची विक्रमी निर्यात अशावेळी झाली आहे, जेव्हा भारत सरकार चीनकडून आयातीवर प्रतिबंध लावण्याच्या पद्धतींवर विचार करत आहे आणि अनेक चीनी अ‍ॅप्स आणि कंपन्यांवर प्रतिबंध लावला आहे.