Corona Update : कोरोनामुळे 24 तासात 3.26 लाख लोक झाले संक्रमित, 3890 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची स्थिती अजूनही भयंकर आहे. दररोज 3 लाखांपेक्षा जास्त नवीन केस येत आहेत आणि सुमारे 4 हजार संक्रमितांचा मृत्यू होत आहे. मात्र, चांगली बाब ही आहे की, नवीन केस पेक्षा रिकव्हरी जास्त होत आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी ताज्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात 326,098 नवीन कोरोना केस आल्या आणि 3890 संक्रमितांचा मृत्यू झाला. तर 3,53,299 लोक कोरोनातून बरे झाले. म्हणजे 31,091 अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत.

14 मेपर्यंत देशभरात 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 कोरोना डोस दिले गेले. काल 11 लाख 3 हजार 625 डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 31.30 कोटीपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल 17 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले. पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्केपेक्षा जास्त आहे.

देशात आज कोरोनाची ताजी स्थिती –
* एकुण कोरोना केस – दोन कोटी 43 लाख 72 हजार 907
* एकुण डिस्चार्ज – दोन कोटी 4 लाख 32 हजार 898
* एकुण अ‍ॅक्टिव्ह केस – 36 लाख 73 हजार 802
* एकुण मृत्यू – 2 लाख 66 हजार 207

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 83 टक्केपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्टिव्ह केस कमी होऊन 16 टक्केपेक्षा कमी झाल्या आहेत. कोरोना अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात जगात भारताचे दुसरे स्थान आहे. एकुण संक्रमितांच्या संख्येच्या बाबती सुद्धा भारताचे दुसरे स्थान आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये घट
महाराष्ट्रात शुक्रवारी कोविडची नवीन प्रकरणे आणि यामुळे जीव गमावणार्‍यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत समोर आलेल्या कोरोनाच्या एकुण प्रकरणांची संख्या 53 लाख पेक्षा जास्त झाली आहे. तर राज्यात 79,000 पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.

गुरुवारी झालेल्या 850 मृत्यूंच्या तुलनेत, शुक्रवारी राज्यात मरणार्‍यांची संख्या 695 नोंदली गेली. यासोबतच येथे कोरोनाने जीव जाणार्‍यांची संख्या 79,552 पर्यंत पोहचली आहे. दिलासादायक गोष्ट ही आहे की, शुक्रवारी नवीन संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 50,000 च्या स्तराच्या खाली होती. येथे मागील 24 तासादरम्यान 39,923 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यानंतर आता राज्यात एकुण प्रकरणांची संख्या वाढून 53,09,215 झाली आहे.