देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 36 लाखापेक्षा जास्त, 64469 मृत्यूसह जगातील तिसर्‍या क्रमांकावर भारत, आता फक्त ब्राझील-अमेरिका पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या कोरोनाची आकडेवारी इतकी वाढत चालली आहे की भारत रोज नवनवे रेकॉर्ड तोडत आहे. देशात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 36 लाखांच्या पुढं गेली आहे. त्यापैकी 27,74,802 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील 24 तासात 78 हजारांपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. भारत मृत्यूच्या बाबतीत जगात तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारी नुसार, देशात मागील 24 तासात 78,512 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आणि एकूण कोरोना रुग्णांची संख्या 36 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात 971 जणांचा मृत्यू झाला आणि आत्तापर्यंत देशात 64,469 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना मृत्यूच्या बाबतीत भारत मेक्सिकोला मागे टाकत संपूर्ण जगात तिसऱ्या स्थानी आला आहे. भारतात 64,469 जणांचा मृत्यू झाला, अमेरिकेत 1,87,224 जणांचा, ब्राझील मध्ये 1,20,896 जणांचा तर मेक्सिको मध्ये 64,158 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 7,81,975 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येचा दर वाढून तो 76.61% इतका झाला असून आणि मृत्युदर 1.79% आहे.

रविवारी सापडलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

देशात मागील 24 तासात 78,512 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27,74,802 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35,42,733 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत देशात 64,469 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासात 971 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.