हीच योग्य वेळ, ‘कमांडो ऑपरेशन’ करून POK ताब्यात घ्या, सनदी अधिकाऱ्याचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्व जग आणि भारत कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढत असातना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एक सल्ला दिला आहे. सध्या पाकिस्तान अस्थिर आहे. घाबरलेला आहे. पाकिस्तानने बेकायदेशरपणे काश्मीरचा जो प्रदेश ताब्यात घेतला आहे तो प्रदेश ताब्यात घेण्याची योग्य वेळ आहे, असं त्यांनी फेसबूकवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://m.facebook.com/story.php story_fbid=1516305308539546&id=100004802732092

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या या सल्ल्यावर टीका केली आहे. कोरोना व्हायरसशी सरकार आणि आपण सगळे लढत आहोत. त्या विरुद्धची लढाई आपण नक्कीच जिकू. मात्र, चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही कोरोनाइतकीच धोक्याची आहे असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने देशातील सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. तर देशांतर्गत विमान सेवा देखील उद्या (मंगळवार) रात्री बारा नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त माल वाहतूक सेवा सुरु राहणार असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली असून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.