RCEP करारावर स्वाक्षरी न करण्याची घोषणा करत PM मोदींनी केलं जबरदस्त भाषण, सर्वत्र होतय ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने RCEP करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, या कराराचा मुख्य उद्देश स्पष्ट होत नसून भारताच्या कोणत्याही हितांबरोबर आम्ही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे माझे अंतर्मन मला यावर स्वाक्षरी करण्यास नकार देत असून यामुळे भारत याचा भाग असणार नाही.

या मुद्द्यांचे स्पष्टीकरण नाही
१) आयातीच्या विरोधात सुरक्षेची हमी नाही
२) चीन बरोबर मतभेद
३) बाजारात दखल आणि गैर टेरिफ बांधांवर कोणतेही आश्वासन नाही

याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी सांगितले कि, पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या हितांची सुरक्षा केली आहे. त्याचबरोबर मोदींच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक देखील केले आहे. त्याचबरोबर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत भारतीयांबरोबर उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

मोदींनी RCEP संमेलनात मांडल्या या गोष्टी
या संमेलनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, भारत नेहमीच या काराराविषयी सकारात्मक राहिला आहे. त्याचबरोबर या कराराच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यातील गोष्टींच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध राहिला आहे. मागील सात वर्षांपासून आपण या मुद्द्यावर चर्चा करत आहोत. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून याच्या मूळ कार्याशी किंवा मूळ उद्देशाची पूर्तता हा करार करत नसल्याने आम्ही यावर स्वाक्षरी करणार नाही.

मूळ उद्देशांची पूर्तता करत नाही
भारतातील अनेक मुद्यांवर आणि संकटावर यामध्ये काहीही उपाय नसून यामुळे भारत यामध्ये सहभागी होणार नाही. भारतातील शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. याचबरोबर कामगार आणि नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसणार आहे. या करारामध्ये मूळ उद्देशांची पूर्तता होताना दिसून येत नसून यामुळे मी घेणाऱ्या निर्णयांचा भारतातील गरिबांना फायदा होत नसेल तर माझे अंतर्मन मला हा निर्णय घेण्यास परवानगी देत नाही.

Visit : Policenama.com