India China Faceoff : लडाखमधील राफेल अन् चीन घाबरला, तैनात केली J-20 विमानं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लडाखमधील चीनची अरेरावी पाहता भारतानं आता फ्रान्समधून आणेलली प्रगत फायटर राफेल विमानं चीनला लागू असलेल्या सीमा भागात तैनात केली आहेत. यानंतर आता चीननंही सीमेवर लढाऊ विमानं तैनात केली आहेत.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनं भारतीय आणि चीनी सैन्यांदरम्यान पुन्हा कारवाईची शक्यता लक्षात घेता लडाख भागात लढाऊ विमानं तैनात केली आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुसेनेनं (पीएलए) पाचव्या पिढीची लढाऊ विमानं जे 20 लडाखच्या पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील काठावर तैनात केली आहेत. अजूनही या भागात मोठ्या प्रमाणात विमानं उड्डाण करत आहेत.

सरकारी सूत्रांनी सांगितलं की, जे 20 लढाऊ विमानं चीनच्या हवाई दलानं हॉटर एअर बेसवर तैनात केली आहेत. ती लडाख आणि लगतच्या भारतीय प्रदेशाच्या जवळ उड्डाण करणार आहेत. अद्यापही चिनी सैन्यामार्फत मोक्याच्या ठिकाणी बॉम्बर विमानं तैनात केली जात आहेत. चीनच्या हवाई दलानं लडाखजवळील हवाई तळांवर आपली अत्याधुनिक व सर्वात सक्षम विमानं पुन्हा कार्यान्वित करण्याची ही कारवाई भारतानं गांभीर्यानं घेतली आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर भारतानं मोठ्या संख्येत लढाऊ विमानं तैनात केली आहेत.