आता ‘डोकलाम’वर ‘वॉच’ ठेऊ शकणार नाही चीन, भारतानं बदलली सर्वच ‘परिस्थिती’

नवी दिल्ली : वृत्तसंथा – डोकलाम वाद सर्वांनाच आठवत असेल, 2017 मध्ये सुमारे 73 दिवसांपर्यंत भारतीय लष्कर आणि चीनी लष्करामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यावेळी भारतीय लष्कराने या भागात चीनी लष्कराला मागे जाण्यास भाग पाडले होते. आता या भागात भारताची विकासाची गाडी वेगाने धावत आहे.

कारण, सीमा रस्ते संस्थेने 2019 मध्ये सुमारे 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधले असून विकास केला आहे. ज्यामध्ये डोकलामजवळील 19.72 किलोमीटर लांबीचा एक महत्वाचा रस्ताही आहे.

2019 च्या बीआरओच्या सर्वात महत्वपूर्ण कामात 19.72 किलोमीटर लांबीच्या भीम बेस-डोकला रस्ता बांधणी कामाचा समावेश आहे. हा रस्ता भारतीय लष्कराला रणनीतिच्या दृष्टीने महत्वाच्या डोकला तळावर जाण्यास उपयोगी ठरणार आहे. हा रस्ता सिक्किममध्ये वादग्रस्त डोकलाम पठाराच्या काठावर आहे. येथे पोहचण्यास आता केवळ 40 मिनिटे लागणार आहेत. यापूर्वी येथे जाण्यास 7 तास लागत असत.

हा रस्ता सर्व ऋतूमध्ये वापरता येणारा ऑल वेदर ब्लॅक ट्रॅक असेल, ज्याच्यावर वजन वाहतूक क्षमतेचे बंधन असणार नाही. डोकलाममध्ये 2017 मध्ये भारतीय लष्कर आणि चीनी पिपल्स लिब्रेशन आर्मीमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, त्यावेळी भारतीय सुरक्षा दलांना येथे कमी वेळात पोहोचणे शक्य नव्हते. यादृष्टीने या रस्त्याचे महत्व वाढले आहे.

याच परिसरात चीन आणि भारताच्या उत्तर-पूर्वमध्ये सिक्किम आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात. 2017 मध्ये डोकलाम वादामुळे दोन्ही देशाचे लष्कर समोरासमोर आले होते. त्यानंतर चीनच्या वूहानमध्ये 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अनौपचारिक शिखर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा रूळावर आले होते.

भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणी आणि विकासाचे काम करणार्‍या बीआरओने काही अनुकूल शेजारी देशांतही रस्तेबांधणीचा विकास केला आहे.

बीआरओने या वर्षी आतापर्यंत 1,123.46 कि. मी.चे रस्ते बांधले आहेत. 2,099.58 कि. मी. च्या रस्त्यांचे सरफेसिंग काम आणि 2,339.38 कि. मी. रस्त्यांचे रिसरफेसिंगचे काम केले आहे. बीआरओने 2019 मध्ये रस्त्यांशिवाय सीमावर्ती भागाजवळ दुर्गम भागात मुख्य पूल, 19 19 एयरफील्ड आणि दोन भुयारांचा विकास केला आहे.

याशिवाय, बीआरओ ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याखाली सुद्धा एक भुयार रस्ता तयार करत आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये 297 किलोमीटर लांबीचा दुपदरी निम्मू – पदम – दरचा (एन-पी-डी) रस्ता तयार करत आहे. हा 257.55 कि. मी.चा रस्ता पूर्ण झाला आहे.

अखनूर-पुंछ रस्त्यासह बलिपाडा, चारूदर आणि तवांगकडे जाणारा रस्त्यावरही बीआरओ भुयारी मार्ग विकसित करत आहे. बीआरओला 61 भारत-चीन सीमा रस्त्यांचे काम दिले गेले होते. या रस्त्याची लांबी 3,346 किमी आहे.

चीनने या वर्षी जूनमध्ये डोकलामजवळ रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु, भारतीय जवानांनी चनीचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. दरम्यान भूतानशी केेलेल्या करारानुसार भारत आपल्या शेजारी राष्ट्रांचे रक्षण करण्यास बांधील आहे. अशा स्थितीत भारताने अशाप्रकारे दखल देणे योग्य ठरते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/