लोकशाही सूचकांकात भारताची मोठी घसरण, EIU च्या अहवालात अनेक खुलासे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विकासदरानंतर आता डेमोक्रॅसी इंडेक्स म्हणजेच जागितक लोकशाही सूचकांकातही भारताची मोठी घसरण झाली आहे. भारत हा लोकशाही सूचकांकाच्या जागतिक क्रमावारीत दहाव्या स्थानावर होता परंतु आता भारत 51 व्या स्थानावर गेला आहे. इतकंच नाही तर EIUनं जारी केलल्या अहवालात भारतातील लोकशाही सदोष असल्याचंही म्हटलं आहे. भारतात नागरी स्वातंत्र्यामध्येही घसरण झाल्याचा दावा EIUनं केला आहे. द इकनॉमिस्ट इंटेलिजेंट्स(EIU)नं 2019 चा अहवाला जारी केला आहे. यातून ही माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार भारताचे गुण 7.23 होत जे आता 6.90 झाले आहेत. म्हणजेच त्याच घसरण झाली आहे. भारताचं लोकशाही सूचकांकातील स्थान 10 होतं जे आता 51 झालं आहे. देशातील नागरिक स्वातंत्र्याच्या ऱ्हासामुळे भारताची मोठी घसरण झाली आहे असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. EIU दरवर्षीच हा अहवाल जारी करत असतं. 165 स्वतंत्र देश आणि दोन क्षेत्रातील लोकाशाहीच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून हा अहवाल जारी केला जातो.

लोकशाही सूचकांक ज्या मुद्द्यांवर आधारीत असतो त्यात निवडणूक प्रक्रिया, सरकराचं कामकाज, राजकीय भागिदारी, राजकीय संस्कृती स्वातंत्र्य आदी मुद्द्यांचा समावेश असतो. यातील जे गुण दिले जातात ते चार प्रकारच्या शासन व्यवस्थेनुसार दिले जातात. पूर्ण लोकशाहीसाठी एकूण 8 गुण दिले जातात. ज्या लोकशाहीत त्रुटी आहेत त्यासाठी 6 पेक्षा जास्त आणि 8 पेक्षा कमी गुण दिले जातात. तर मिश्र शासन व्यवस्था असेल तर 4 पेक्षा अधिक आणि 6 पेक्षा कमी गुण दिले जातात. सत्तावादी शासन असेल तर 4 किंवा त्यापेक्षा कमी गुण दिले जातात.

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा भारताचा समावेश त्रुटीपूर्ण लोकशाहीत करण्यात आला आहे. या यादीत चीन 153 व्या स्थानी असून वैश्विक रँकिंगचा विचार केला तर चीन सर्वात खालच्या स्तरावर आहे. या यादीत नॉर्वे सर्वोच्च स्थानी आहे. पाकिस्तानला 108 व्या स्थानीच समाधान मानावं लागलं आहे. रशिया 134 व्या स्थानी आहे. विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझीलनं या यादीत 52 वं स्थान पटकावलं आहे. श्रीलंका या यादीत 69 व्या, बांग्लादेश 80 व्या आणि उत्तर कोरिया 167 व्या स्थानी आहे.

फेसबुक पेज लाईक करा –