ICC World Cup 2019 : सट्टा बाजारातही ‘टीम इंडिया’च ‘फेव्हरेट’ !

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज मंगळवारी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात न्युझिलंडच्या संघाचे आव्हान स्वीकारत भारतीय संघ मैदानात उतरणार असला तरी प्रेक्षक आणि सट्टाबाजारात भारताला पसंती दिली जात आहे. या सामन्यादरम्यान जगभरात अधिकृत आणि अनाधिकृत सट्टा बाजारात प्रचंड आर्थिक उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

सट्टा लावणाऱ्याकडून भारतीय संघाला पसंती दिली जात आहे. मंगळवारचा सामना आणि विश्व चषक विजयासाठी सट्टा लावणाऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघच फेव्हरेट आहे. सट्टा बाजारातील लॉडब्रोक्स आणि बॅटवे या संकेतस्थळावरही भारतीय संघाला पसंती दिली जात आहे.

लॉडब्रोक्स वर सध्या भारत १३/८, इंग्लड १५/८, ऑस्ट्रेलिया ११/४, न्युझिलंड ८/१ असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. बॅटवे वरही भारतीय संघ जिंकणार असा कल दिसून येतो. या ठिकाणी भारत २.८, इंग्लड ३, ऑस्टेलिया ३.८, आणि न्युझिलंड ९.५ अशा प्रमाणात सट्ट्याची गणिते असल्याचे दिसून येत आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर भारतीय संघावर तुम्ही १००० लावले तर सध्या किंमत १३/८ नुसार जर तुम्ही जिकंलात तर प्रथम तुम्ही लावलेली किंमत ही १३ ने गुणली जाणार आणि त्याला ८ ने भागले जाणार. त्यानंतर येणाऱ्या किंमतीमध्ये तुम्ही सट्टा लावलेल्या किंमतीचा आकडा जोडला जाणार.
१०००/१३ = १३०००
#८= १६२५+१००० = २६२५

भारतीय संघातील रोहित शर्मावरही सट्टा लावणाऱ्यांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. जगातील अनेक देशामध्ये सट्टा अधिकृतपणे खेळला जातो. भारतात मात्र, त्यावर बंदी आहे. त्यामुळे चोरुन लपून देशभरात कोट्यावधीचा सट्टा लावला जातो. त्यातील एखाद् दुसऱ्या ठिकाणी सुरु असलेल्या सट्टावर पोलीस छापा घालतात व त्याची मोठी बातमी होते. मात्र, फोनद्वारे देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर सट्टा खेळला जातो.

‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत ! करा ‘हे’ घरगुती उपाय

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई