भारताचा लढा COVID-19 सोबत सुरू असताना पाकिस्तान मात्र ‘दहशतवादी’ खुरापतीत ‘व्यस्त’ : लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासह संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देश या कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाशी झुंज देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे . असे असताना पाकिस्तान मात्र आपल्या दहशतवादी कृत्य करण्यात मग्न आहे. भारताला एकीकडे कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी सामना करावा लागत आहे तर तिकडे सीमेवर भारतीय जवान अतिरेक्यांशी लढत आहेत.

” एकीकडे भारत आणि संपूर्ण जग कोविड -१९ शी लढत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद निर्यात करतोय अशी टीका भारताचे लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी शुक्रवारी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आम्ही केवळ स्वतःच्या नागरिकांनाच नव्हे तर उर्वरित जगासाठी देखील वैद्यकीय पथके पाठवून औषधे निर्यात करून व्यस्त असताना. दुसरीकडे पाकिस्तान केवळ दहशतवादाची निर्यात करत आहे. यामुळे ही बाब चांगली नाही,” असे सेना प्रमुखांनी एएनआयला सांगितले.

एलओसीच्या कारवायांचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असलेले लष्कर प्रमुख म्हणाले की, “हे अत्यंत दुर्दैवी आहे की जेव्हा संपूर्ण जग आणि भारत साथीच्या आजाराशी लढा देत आहे, तेव्हा आपला शेजारी आपल्यासाठी त्रास वाढवत आहे.” ”

अलिकडे नियंत्रण रेषेत पाकिस्तानकडून युद्धबंदीचे अनेकदा उल्लंघन झाले आहे.अलीकडेच, पाकव्याप्त काश्मीरमधील दुधनियाल भागात दहशतवादी लॉन्चपॅडच्या विरोधात भारतीय सैन्याने अचूक स्ट्राईक केले. केरन सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने केलेल्या शस्त्र संधीच्या उल्लंघनंतर आणि घुसखोरीच्या मालिकेनंतर भारतीय सैन्याने हे ऑपरेशन केले.

केरन सेक्टरमधून घुसखोरी करणार्‍या पाच दहशतवाद्यांनाही 1 एप्रिल रोजी भारतीय सैन्याने ठार केले. दुधनियाल येथे सैन्याने लक्ष्य केलेले आणि नष्ट केलेलया समान, लाँच पॅडचा वापर दहशतवाद्यांनी केला होता. त्यामुळे एकूणच भारताला एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे पाकिस्तानी दहशतवाद्यांना तोंड द्यावे लागत आहे असे लष्कर प्रमुख म्हणाले.