भारताला मिळाला देशातील सर्वात मोठा जिल्हा, एक भाग पाकिस्तान तर दुसरा चीनच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 हटल्यानंतर आता जम्मू-कश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. त्याचबरोबर भारताला सर्वात मोठा जिल्हा देखील मिळाला आहे.

भारत को मिला देश का सबसे बड़ा जिला, एक हिस्सा पाकिस्तान तो एक चीन के कब्जे में

लेह असे या जिल्ह्याचे नाव असून नवीन आकारानुसार लडाख क्षेत्रफळाच्या दृष्टीने जम्मू काश्मीरपेक्षा मोठे असून त्याच्याकडे मात्र दोनच जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत. त्यामुळे लेह आता भारतातील सर्वात मोठा जिल्हा बनला आहे. त्याचबरोबर लेहचा एक मोठा हिस्सा हा पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात देखील आहे.

भारत को मिला देश का सबसे बड़ा जिला, एक हिस्सा पाकिस्तान तो एक चीन के कब्जे में

याआधी गुजरातमधील कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा होता. स्वातंत्र्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये 14 जिल्हे होते. यामध्ये कठुआ, जम्मू, ऊधमपुर, रियासी, अनंतनाग, बारामूला, पुंछ, मीरपुर, मुजफ़्फराबाद, लेह आणि लडाख गिलगिट , गिलगिट वजारत, चिल्हास आणि ट्रायबल टेरिटॉरी या चौदा जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानंतर आता यांचे 28 जिल्हे झाले असून या नवीन निर्णयानंतर आता भारतात २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीरच्या अखंडतेविषयी बोलायचे झाल्यास पाकिस्तानच्या ताब्यातील काही भाग आणि चीनच्या ताब्यातील काही भागाचा देखील भारताच्या अखंड काश्मीरमध्ये समावेश होतो.

भारत को मिला देश का सबसे बड़ा जिला, एक हिस्सा पाकिस्तान तो एक चीन के कब्जे में

1948 पासून काही भागावर पाकिस्तानने कब्जा केला आहे तर 1950 पासून काही भागावर चीनने कब्जा केला आहे. त्यामुळे चीन आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सीमावाद सुरु आहे.

भारत को मिला देश का सबसे बड़ा जिला, एक हिस्सा पाकिस्तान तो एक चीन के कब्जे में

दरम्यान, आता जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झाले असून त्याचबरोबर लडाख देखील केंद्रशासित प्रदेश असणार आहे.

Visit : Policenama.com