भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन 

भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून त्यातूनच कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याचे सांगितले जात आहे. मनसेच्या कार्यकत्यांकडून याबाबतचे व्हिडिओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एक पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्या.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e10282b1-b4ad-11e8-88f5-95b96c97c5b4′]

याबाबत बसचे चालक व वाहक यांनी सांगितले की, वारजे ते चिंचवड ही बस घेऊन आम्ही बस पार्किंगमधून टेस्टींग करुन बाहेर आणली व हजेरी लावण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये गेलो होतो. त्यादरम्यान रस्त्यावर असणाऱ्या बसने पेट घेतला. त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली.
बस पुढील बॉनेटच्या बाजूने पेटली होती. बसला आग लागली तर ती अशा प्रकारे पेटत नाही. त्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी ती पेटवून दिली अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अग्निशामन दलाला या घटनेची माहिती सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने गाडी घटनास्थळी जाऊन त्यांनी आग विझविली. पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.

सराफाच्या ४ लाखांच्या सोन्यावर कारागिराचा डल्ला

दरम्यान, कुमठेकर रोडवर सकाळी सात वाजता एका बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या.  या दोन घटना वगळता आतापर्यंत शहरात शांतता असून सकाळी दुध व अन्य साहित्यांची विक्री करणारी दुकाने उघडी होती. पीएमपी बस, रिक्षांची वाहतूक सुरु आहे.

‘ती’ बस पेटवली नसुन पेटली
कोथरूड डेपोमधील बस पहाटेच्या सुमारास पेटवुन देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ती बस पटविण्यात आली असुन पेटल्याचे निष्पन्‍न झाले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये बसला कोणीही पेटविताना दिसून आलेले नाही. कदाचित सीएनजी गॅसमुळे अथवा इतर तांत्रिक बाबीमुळे बसने पेट घेतला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. दरम्यान, झोन-2 चे पोलिस उपायुक्‍त यांनी स्वतः कोथरूड डेपो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये बस पेटविण्यात आल्याचे कुठेही चित्रीकरण झालेले नाही. कोथरूड डेपोमधील बस पेटविली नसुन बसने पेट घेतल्याचे समोर आले आहे.