चीनला बसणार आणखी एक झटका ! आता मोदी सरकारनं मोठा निर्णय घेत ‘पॉवर टिलर’ केला स्थगित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   शेतीमध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या ट्रॅक्टरच्या नावाने फेमस पॉवर टिलरचे फ्री इम्पोर्ट बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने पॉवर टिलर आणि त्याचे सुटे भाग यांच्या आयातीला रिस्ट्रिक्टेड कॅटेगिरीत टाकले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आता सरकारच्या परवानगीशिवाय याचे इम्पोर्ट चीनमधून करता येणार नाही. अजूनपर्यंत पॉवर टिलर कितीही इम्पोर्ट करता येत होता. टिलर एक कृषी मशीन आहे, ज्याचा वापर शेतीसाठी जमीन तयार करण्यासाठी केला जातो. पावर टिलरचे सुट्या भागात इंजिन, ट्रान्समिशन, चेसिस आणि रोटावेटर यांचा सहभाग आहे.

काय आहे नवीन निर्णय

परदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एक अधिसूचना काढली असून यामध्ये म्हटले आहे की, पॉवर टिलर आणि त्याचे सुटे भाग आयात नितीमध्ये बदल करून मुक्त पासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.

एखाद्या उत्पादनाला प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्याचा अर्थ असा आहे की, आयातदाराला याची आयात करण्यासाठी डीजीएफटीकडून लायसन्स घ्यावे लागेल. अशा प्रकारे पावर टिलरच्या स्पेअरपार्टसाठी सुद्धा 10 टक्के मर्यादा ठरवण्यात आली आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, अर्जदार किमान तीन वर्ष या व्यवसायात असावा आणि त्याने मागील तीन वर्षात किमान 100 पॉवर टिलर विकलेले असावेत.

पॉवर टिलरबाबत जाणून घेवूयात…

ही शेतीची एक अशी मशीन आहे, जी शेत नांगरणीपासून पीक कापण्यापर्यंत खुप कामे करते. या मशीनद्वारे नांगरणी, सिंचन, खुरपणी, गाळप व पेरणी करणे खुप सोपे जाते.

ज्याप्रकारे पारंपारिक नांगराने पेरणी केली जाते, तशाच प्रकारे या मशीनद्वारे पेरणी करता येते. विशेष म्हणजे पावर टिलरमध्ये अन्य कृषी यंत्र जोडून अनेक अन्य कामे करता येतात. पॉवर टिलर ट्रॅक्टरच्या तुलनेत खुप हलका आणि सुटसुटीत असतो. हे मशीन चालवणे सुद्धा खुप सोपे असते. हा अनेक कंपन्या तयार करतात. हे मशीन पेट्रोल आणि डिझेल दोन्हीवर चालू शकते.

अनेक कामे करतो सोपी

हे मशीन शेतीच्या प्रत्येक कामात मदत करते. पॉवर टिलरमध्ये पाण्याचा पंप जोडून शेतकरी तलाव, विहिर, नदी इत्यादीमधून पाणी काढू शकतात. यामध्ये थ्रेसर, रीपर, कल्टीवेटर, बीज ड्रिल मशीन इत्यादी जोडता येते. पॉवर टिलर खुप हलकी मशीन असल्याने ती सहज कुठेही नेता येते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like