Coronavirus : अमेरिका, ब्राझीलनंतर भारतात सर्वात जास्त नव्या केस, गंभीर रूग्णांच्या प्रकरणात दुसर्‍या नंबरवर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात लागोपाठ सातव्या दिवशी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांनी विक्रम केला आहे. मंगळवारी भारतात 9983 नवी प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामुळे एकुण संक्रमितांची संख्या वाढून 2,66,598 झाली आहे. कोविड-19 मुळे भारतात आतापर्यंत 7466 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगभरात सर्वात जास्त नव्या केसेस भारतात सापडत आहेत.

या शिवाय गंभीर रुग्णांच्या बाबतीत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वाधिक गंभीर रुग्ण अमेरिकेत आहेत, तेथे 16,907 गंभीर रूग्ण आहेत. त्याचबरोबर भारतात गंभीर प्रकरणांची संख्या 8944 वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरसने प्रभावित टॉप 10 देश

देश प्रकरणे मृत्यू

युनायटेड स्टेट 2,026,597 113,061
ब्राझील 710,887 37,312
रशिया 485,253 6,142
स्पेन 288,797 27,136
इंग्लंड 287,399 40,597
भारत 2,66,598 7466
इटली 235,278 33,964
पेरू 199,696 5,571
जर्मनी 186,233 8,792
इराण 173,832 8,351

भारतात एका दिवसात सर्वाधिक केसेस

देशात एका दिवसात कोरोना व्हायरस संसर्गाच्या सर्वाधिक 9987 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संक्रमित रूग्णांची संख्या 2,66,598 वर पोहोचली होती. तसेच एक दिवसात विक्रमी 266 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्या देशात 1,29,917 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत 48.47 टक्के लोक बरे झाले आहेत. संक्रमित झालेल्यांमध्ये काही परदेशी नागरिक देखील आहेत.

मंगळवारी सकाळपर्यंत 266 मृत्यूंपैकी महाराष्ट्रत 109 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिल्लीत 62, गुजरातमध्ये 31, तामिळनाडूमध्ये 17, हरियाणामध्ये 11, पश्चिम बंगालमध्ये 9, उत्तर प्रदेशात 8, राजस्थानात 6, जम्मू-काश्मीरमध्ये 4, कर्नाटकात 3, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 2, बिहार आणि केरळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात

देशात आतापर्यंत एकुण 7,466 मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त 3,169 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर गुजारतमध्ये 1,280, दिल्लीमध्ये 874, मध्य प्रदेशमध्ये 414, पश्चिम बंगालमध्ये 405, तमिळनाडुमध्ये 286, उत्तर प्रदेशात 283, राजस्थानात 246 आणि तेलंगनात 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोविड-19 मुळे 75, कर्नाटकात 64 आणि पंजाबमध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये 45, हरियाणामध्ये 39, बिहारमध्ये 31, केरळात 16, उत्तराखंडमध्ये 13, ओडिसात 9, झारखंडमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, हिमाचल प्रदेश आणि चंडीगढमध्ये कोविड-19 मुळे 5-5 आणि आसाम तसेच छत्तीसगडमध्ये चार-चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मेघालय आणि लडाखमध्ये एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार मृतांपैकी 70 टक्केपेक्षा जास्त लोक पहिल्यापासून इतर आजारांनी ग्रस्त होते.

दिल्लीत कोरोना व्हायरसच्या एकुण सुमारे 30000 केस

आरोग्य मंत्रालयाने सकाळी जारी केलेल्या आकड्यांनुसार संसर्गाची सर्वात जास्त 88,528 प्रकरणे महाराष्ट्रातील आहे. यानंतर तमिळनाडुत 33,229, दिल्लीत 29,943, गुजरातमध्ये 20,545, उत्तर प्रदेशात 10,947, राजस्थानात 10, 763 आणि मध्य प्रदेशात 9,638 आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 8,613, कर्नाटकात 5,760, बिहारमध्ये 5,202, हरियाणात 4,854, आंध्र प्रदेशात 4,851, जम्मू-काश्मीरमध्ये 4,285, तेलंगनात 3,650 आणि ओडिसात 2,994 प्रकरणे आहेत. यानंतर पंजाबमध्ये 2,663, आसाममध्ये 2,776, केरळात 2,005 आणि उत्तराखंडमध्ये 1,411 लोक संक्रमित आहेत.

झारखंडमध्ये 1,256, छत्तीसगढमध्ये 1,160, त्रिपुरात 838, हिमाचल प्रदेशात 421, गोवामध्ये 330 आणि चंडीगढमध्ये 317 प्रकरणे आहेत. मणिपुरमध्ये संसर्गाची 272, पुदुचेरीमध्ये 127, नागालँडमध्ये 123 प्रकरणे आहेत. लडाखमध्ये 103, अरुणाचल प्रदेशात 51, मिझोरामध्ये 42, मेघालयात 36, अंदमान-निकोबार द्वीप समूहात 33 प्रकरणे आहेत. तर दादर-नगर हवेलीत 22 आणि सिक्किममध्ये 7 प्रकरणे आहेत.