भारतामध्ये कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत घट पण मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. देशात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर गेली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात भारतात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. परंतु जगाच्या तुलनेत नव्या बाधितांची संख्या भारतात सर्वाधिकच आहेत.

दरम्यान, जगभरात ज्या ठिकाणी ४८ लाखांपेक्षा थोडे अधिक नवे रुग्ण समोर आलेत आणि मृत्यूंची संख्याही ८६ हजारांपेक्षा थोडी कमी आहे. याची गेल्या आठवड्याच्या आकडेवारीशी तुलना केल्यास हे प्रमाण अनुक्रमे १२ टक्के आणि पाच प्रतितास इतकं आहे. सर्वाधिक प्रकरणं ही भारतातून समोर आली आहे. परंतु गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये १३ टक्क्यांची घट झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेत २१ टक्क्यांची घसरण झाली असून ब्राझीलमध्ये तीन टक्के, अर्जेंटिना आठ टक्के आणि कोलंबियात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

मृतांची आकडेवारी पाहिल्यास भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. देशात २७ हजार ९२२ इतक्या नव्या नोंदी झाल्या. नव्या दोन लोकांचा मृत्यू प्रति एक लाख लोकांमागे होत असून हे प्रमाण चार टक्के इतकं असल्याचं समोर आलं आहे. यानंतर नेपाळ आणि इंडोनेशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. इंडोनेशियात हे प्रमाण पाच टक्क्यांनी घटलं आहे.

भारतात सर्वाधिक नव्या प्रकरणांची नोंद
९ मे पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेद्वारे राष्ट्रीय अधिकाऱ्यांकडे मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक २७,३८,९५७ नव्या प्रकरणांची नोंद झाली. ही आकडेवारी त्या पूर्वीच्या आठवड्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात कोरोनाची २.४६ कोटी एकूण प्रकरण आहेत आणि मृत्यूंची संख्या २,७०,२८४ इतकी आहे.