भारतामध्ये पगाराची समस्या, नौकरीची नाही ; ‘या’ बड्या IT कंपनीच्या माजी अधिकाऱ्याचे वक्तव्य

बेंगळुरू : वृत्त संस्था – इन्फोसिसचे माजी सीएफओ आणि दिग्गज गुंतवणूकदार टी.वी. मोहनदास पई यांनी म्हंटले की, भारतामध्ये नौकरीची नाही तर पगाराची समस्या आहे. भारतामध्ये कमी पगाराच्या नौकऱ्याची संधी उपलब्ध होत आहे परंतु पदवीधारकांना अशा नौकऱ्यांची अपेक्षा नाही. त्यांनी बेरोजगारीच्या आकड्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

१० ते १५ हजार रुपयांच्या नौकऱ्या उपलब्ध

पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, भारतामध्ये चांगल्या पगाराच्या नौकऱ्या उपलब्ध होत नाहीत. १० ते १५ हजार रुपयांच्या नौकऱ्या अधिक आहेत. या नौकऱ्यांना पदवीधारकांकडून पसंती मियाच ळत नाही. भारतामध्ये पगाराची कामाची समस्या नसून पगाराची समस्या आहे. याचबरोबर भारतामध्ये क्षेत्रीय आणिभौगोलिक समस्या देखील आहे.

पई यांनी सल्ला दिला की, चीनसारखे भारताने श्रमप्रधान उद्योग सुरु केले पाहिजेत आणि बंदराच्या जवळ उद्योग निर्माण केले पाहिजेत. त्याचबरोबर कमी पगारावर नौकरी करणाऱ्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हायटेक संशोधनामध्ये अधिक गुंतवणूक केली पाहिजे.

त्यांनी म्हंटले की, या समस्येवर चीनने काय केले हे आपल्याला पाहायला पाहिजे. चीनने पहिल्यांदा श्रमप्रधान उद्योग तयार केले. पूर्ण जगाला सांगितले की तुम्ही आमच्या श्रमाचा वापर करा आणि निर्यातीचा व्यवहार चीनने पाहिला. आपण श्रम प्रधान उद्योगांना प्रोत्साहन दिलेले नाही. आपल्या जवळ योग्य नीती नाहीय. यांमुळे आपण आपल्या पूर्ण श्रमाचा वापर करून घेऊ शकत नाही आहोत.

बेरोजगारीचे आकडे चुकीचे

पई यांनी सांगितले की सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमी यांच्याकडून देण्यात आलेले बेरोजगारीचे आकडॆ चुकीचे आहेत. १० कोटी लोकांच्या नौकऱ्या गेल्या ही माहिती चुकीची आहे.