मोदी सरकारचा मलेशियासह ‘या’ 4 देशांना ‘झटका’, 5 वर्ष मोजावी लागणार ‘किंमत’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने चार देशांना म्हणजेच इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि विएतनाम मधून इंपॉर्ट केल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारांवर पाच वर्षांसाठी सबसिडी शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांमधून तांबे तारा आयात केल्याने देशांतर्गत कंपन्यांवर परिणाम होत असल्याचे सरकारच्या तपासणीत उघड झाले आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या तपास पथकाच्या संचालनालय जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) च्या अंतिम निष्कर्षांवर विचार करून अनुदानविरोधी किंवा प्रतिपूर्ती फी लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोमवारी अर्थ मंत्रालयाद्वारे अधिसूचना जारी करून काढण्यात आले आहे.

या चार देशांमधून तांबे तारांच्या आयातीवर सबसिडीविरोधी शुल्क लावण्याची शिफारस डीजीटीआरने केली होती. अधिसूचनेत असे म्हटले आहे की हा प्रतिपूर्ती शुल्क पाच वर्षांसाठी असेल.

डीजीटीआरला तपासात हे जाणवले की, या चारही देशांमध्ये या उत्पादनाची निर्मिती आयात सबसिडीवाल्या शुल्काच्या आधारे केली जात आहे. गेल्या वर्षी छोट्या कंपन्यांनी आवेदन दिले होते या चारही देशांमधून तांब्याच्या तारांना सबसिडी वाल्या किमतीनुसार भारतात पाठवले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/