भारतीय लष्करानं आणि IAF च्या हेलिकॉप्टर्संनी ‘खराब’ हवामानात 15500 फूट उंचावर अडकलेल्या ‘चालक’ दलास वाचवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्य (Indian Army) आणि भारतीय वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरने शुक्रवारी समुद्र सपाटीच्या वर 15,500 फूट उंचीवर अडकलेल्या आयएएफ हेलिकॉप्टरच्या चालक दलास खराब हवामानादरम्यान वाचवले आणि तेथून त्यांना बाहेर काढण्यात मोठे यश मिळविले.

या बचाव पथकात सामील झालेले सैन्य आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर उत्तर सिक्किमच्या उंचीच्या आपत्कालीन लँडिंग साइट पर्यंत पोहोचले आणि बर्फाच्या वादळाचा सामना करत 4 IAF जवान आणि एक एअर डिस्पॅच कर्मचाऱ्यास बाहेर काढले.

आदल्या दिवशी भारतीय वायुसेनेचे एक लढाऊ विमान एमआय -17 हेलिकॉप्टर चैटन ते मुकुतांगला नियमित उड्डाण करत होते परंतु खराब हवामानामुळे त्याला निर्धारित हेलिपॅडपासून 10 समुद्री मैलाच्या अंतरावर आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करावे लागले. यामुळे हेलिकॉप्टरचे काही नुकसान देखील झाले आहे. नंतर शुक्रवारी पहाटे सैन्य आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर तेथे पाठविली गेली आणि त्यांनी मोठ्या पराक्रमाने लँडिंग करत तेथील अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली.

सैन्याने म्हटले आहे की ‘अडकलेल्या लष्कराच्या जवानांना वाचवण्यापूर्वी अनेक तास खराब हवामानाचा सामना करावा लागला. 7 मे रोजी माहिती मिळताच भारतीय लष्करासह आयटीबीपीच्या जवानांनी खराब हवामानात पायी चालून धोकादायक भाग ओलांडले आणि हेलिकॉप्टर लँडिंग साइटमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवली, यासाठी आयटीबीपीचे डॉक्टर देखील सोबत होते.’