‘पर्यटनाला’ प्रोस्ताहन देण्यासाठी मोदी सरकारची ‘विशेष’ योजना, करु शकतात ‘ई – पर्यटक वीजा’ संबंधित घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. ई – टूरिस्ट वीजा प्रणालीसंबधी ही घोषणा आहे. ज्यात पर्यटकांच्या संख्येच्या आधारे वीजा शुल्क आकारण्यात येईल. एका बैठकीत पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की जुलै ते मार्च दरम्यान अधिक संख्येत पर्यटक येतात, तेव्हा भारत १७९४ रुपये शुल्काबरोबर ३० दिवस ई-टूरिस्ट वीजा देणार आहे.

एप्रिल जून दरम्यान वीजा शुल्क –
ते म्हणाले की, लीन सीजन एप्रिल ते जून दरम्यान पर्यटक कमी येतात, तेव्हा भारत ७१७ रुपये शुल्क बरोबर ३० दिवस ई-टूरिस्ट वीजा देईल.

पटेल यांनी सांगितले की ८० अमेरिकी डॉलर शुल्काचा नवा ५ वर्षीय ई – पर्यटक वीजा आणि ४० डॉलर शुल्काचा एक वर्षीय ई – पर्यटक वीजा सुरु करण्यात आला आहे.

या देशांसाठी लीन सीजन असणार हे शुल्क –
जपान, श्रीलंका, सिंगापूर या देशांसाठी लीन सीजनमध्ये ई – पर्यटक वीजाचे शुल्क ३० दिवसांसाठी १० डॉलर आणि एक वर्ष किंवा ५ वर्षासाठी २५ डॉलर असणार आहे.

पर्यटनाला प्रोस्ताहन देण्यासाठी हा आहे सरकारची योजना –
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देशातील महत्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी विदेशी भाषामध्ये साइन बोर्ड लावणे, ई वीजा अर्जाच्या लागणाऱ्या वेळेला कमी करणे आणि वीजा शुल्क कमी करणे या योजना तयार केल्या आहेत. या साइनबोर्डवर क्यूआर कोड देखील असेल, जे स्कॅन केल्यावर त्याला इतिहास आणि इतर संबंधित माहिती देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त