काश्मीर कधीच पाकिस्तानचा भाग नव्हता आणि या पुढेही असणार नाही, मुस्लिम धर्मगुरूंची PAK ला ‘चपराक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मात्र पाकिस्तानसोबत इतर कोणत्याही देशाने उभे राहून बाजू घेण्याच टाळल आहे. आता तर ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी भारताची बाजू घेत पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावली आहे. त्यांनी ट्विट करत काश्मीरच काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे हे नम्रपणे मान्य करायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.

का म्हणालेत नेमकं मुस्लीम धर्मगुरु आपल्या ट्विटमध्ये –

काश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि या पुढेही असणार नाही.
पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचाच भाग आहे.
मुस्लीमांनी हिंदू धर्म सोडून ते इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही.
भारत हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाहून जुना आहे. हे मान्य करायलाच हवे.

https://twitter.com/Imamofpeace/status/1160568511397109760

या आधीही अनेकदा या मुस्लिम धर्म गुरूंनी पाकिस्तानला झापले आहे, पाकिस्तान हे राष्ट्र इस्लामच्या नावाखाली दहशदवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप अनेकदा इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त