महिला कबड्डीमध्येही सुवर्ण हुकले

जकार्ता : वृत्तसंस्था 

पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला कबड्डी संघालाही आशियाई स्पर्धेमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे . गतविजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला आशियाई स्पर्धेत फायनलमध्ये इराणकडून २७-२४ असा पराभव स्विाकारावा लागला. या पराभवामुळे महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

[amazon_link asins=’B01N0762OT,B072X2BGM5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’596e9e8d-a789-11e8-9caa-ffce35730ab2′]

भारतीय महिला संघ सामन्याच्या सुरुवातीला १०-७ असा आघाडीवर होता. पण काही वेळातच इराणने धडाकेबाज कामगिरी करत भारतावर आघाडी मिळवली. सामना संपत आलेला असाताना इराणकडे २५- २१ अशी आघाडीवर होता . अखेरच्या क्षणी भारताच्या साक्षी कुमारीने चढाई करत तीन गुण मिळवले. पण इराणने पुन्हा आघाडी वाढवली आणि सामना २७- २४ ने जिंकला.
इराणच्या संघाने उपांत्य फेरीत भारताला नमवीत २८ वर्षांपासून या खेळापासून असलेली भारताची मक्तेदारी संपुष्टात आणली. सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात इराणच्या महिलांनी भारतीय महिलांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं.