LAC च्या पलीकडील शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर भारताची ‘करडी’ नजर, ‘रडार’वर चीनचे 7 मिलिटरी एयरबेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसोबत झालेल्या वादानंतर चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे. पूर्वीय लाडाखच नाही तर आता भारतीय एजन्सीची नजर देखील लडाख पासून पूर्व अरुणाचल पर्यंत लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलच्या पलीकडे असलेल्या लिब्रेशन आर्मी एअर फोर्सच्या प्रत्येक हालचालीवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताच्या रडारवर चीनचे 7 एयरबेस असल्याचं सांगितलं जातंय.

एएनआयच्या माहितीनुसार भारत चीनच्या शिंजियांग प्रांतातील तिब्बेत क्षेत्रात असलेल्या PLAAF च्या होटन, गार गुंसा, काशगर, हॉपिंग, कोंका जोंग, लिंजी पंगट या एअरबेस वर करडी नजर ठेऊन आहे. सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार, चीनच्या एअर फोर्सने नुकतेच या एअरबेसला अपग्रेड केलं आहे. काही एयरबेसवर रनवेची लांबी वाढवण्यात आली आहे तर, काही ठिकाणी अतिरिक्त जवान तैनात केले आहेत.

माहितीनुसार, लिंजी एअरबेस भारताच्या पूर्वीय राज्यांच्या जवळ आहे. तो मुख्य हेलिकॉप्टर बेस आहे. चीनने एयरबेसच्या जवळ हेलिपॅडचे नेटवर्क तयार केले आहे. यामागचा त्यांचा हेतू सर्विलान्स गती वाढवण्याचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चीन लडाख सोबत अन्य काही भागात लढाऊ विमान तैनात करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सुखोई-30 चा देखील समावेश आहे. लडाख क्षेत्रात भारतीय वायू सेनेचा चीनवर विजय स्पष्ट आहे. याचे कारण असे की, चिनी लढाऊ विमानांना खूप जास्त उड्डाण करावे लागणार आहे, आणि इकडे भारतीय विमानांना मात्र मैदानी भागातून उड्डाण घ्यावा लागेल.